सार्वत्रिक निवडणुकीसाठी २०१४पर्यंत थांबणे काँग्रेसला परवडणारे नसल्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच लोकसभेच्या निवडणुका होतील, अशी खात्री भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी येथे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. मध्य प्रदेश, छत्तीसगढ, दिल्ली आणि राजस्थान या चार राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला कोणतीही आशा नाही. त्यामुळे या विधानसभा निवडणुकांनंतर लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची िहमत काँग्रेसमध्ये नाही. सत्तारूढ आघाडीतील घटक पक्षांचीही धूसफूस वाढत असून आपला पाठिंबा उरणार नाही आणि आपण अल्पमतात जाऊ, अशीही काँग्रेसला भीती आहे.