22 September 2020

News Flash

दिल्लीतील भाजपा मुख्यालय बॉम्बने उडवू, धमकीचा निनावी फोन

पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत

दिल्लीतील भाजपा मुख्यालय बॉम्बने उडवू असा एक निनावी फोन आज भाजपाच्या कंट्रोल रूममध्ये आला. ज्यानंतर दिल्ली पोलिसांनी तातडीने या प्रकरणी चौकशी केली. चौकशीअंती हा फोन कर्नाटकातील मैसूरमधून आला होता असे पोलिसांना समजले आहे. ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. ज्या माहितीत हा फोन कर्नाटकातील मैसूरमध्ये आल्याचे समजले आहे. यापुढचा तपास पोलीस करत आहेत. एएनआय या वृत्तससंस्थेने या संदर्भातले ट्विट केले आहे.

काही महिन्यांपूर्वीच भाजपा मुख्यालय अद्ययावत करण्यात आले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या पुढाकाराने हे मुख्यालय अद्ययावत करण्यात आले आहे. याच मुख्यालयात आज धमकीचा फोन आला होता. यामागे कोण आहे? ही धमकी देण्यामागे हेतू काय हे सगळे ज्याने धमकी दिली त्याला पकडल्यानंतरच समजू शकणार आहे. तूर्तास तरी हा फोन मैसूर या ठिकाणाहून आला होता असे समजल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2019 2:36 pm

Web Title: bjp headquarters control room received a hoax bomb call today delhi police is conducting an investigation scj 81
Next Stories
1 धक्कादायक! शिक्षकाने पत्नी आणि तीन मुलांची गळा चिरुन केली हत्या
2 कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीबाबत भारतानं व्यक्त केली चिंता
3 सिद्धू तुम्ही राजकारणातून संन्यास कधी घेणार? पंजाबमध्ये पोस्टर्स!
Just Now!
X