News Flash

भ्रष्टाचाराबाबत भाजपची दुतोंडी भूमिका-सोनिया गांधी

भ्रष्टाचाराचे ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्याविरुद्ध यूपीए सरकारने त्वरेने कारवाई केली आहे, मात्र मध्य प्रदेशातील ज्या मंत्र्यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी सुरू आहे

| November 22, 2013 01:40 am

भ्रष्टाचाराचे ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्याविरुद्ध यूपीए सरकारने त्वरेने कारवाई केली आहे, मात्र मध्य प्रदेशातील ज्या मंत्र्यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी सुरू आहे त्यांच्याविरुद्ध भाजपने कोणती कारवाई केली, असा सवाल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरूवारी येथे जाहीर सभेत केला. भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर भाजपची दुतोंडी भूमिका असल्याची टीकाही त्यांनी केली.
ज्यावेळी भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली तेव्हा युपीएने त्वरेने कायदेशीर कारवाई केली. भाजपच्या नेत्यांकडून कोटय़वधी रुपये मिळाले, काही मंत्र्यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी सुरू आहे त्यांच्याविरुद्ध भाजपने कोणती कारवाई केली, असा सवाल मतदारांनीच करावा, असे आवाहनही गांधी यांनी या वेळी केली.
‘हत्तीचे खावयाचे आणि दाखवावयाचे दात वेगळे’, असे सांगून सोनिया गांधी म्हणाल्या की, भाजपच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक आहे. भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर लढताना भाजप भूमिका दुतोंडी असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजप  आपली कितीही पाठ थोपटून घेत असला तरी मध्य प्रदेशची सध्या काय अवस्था झाली आहे, हा प्रश्न जनतेनेच विचारावा, असेही त्या म्हणाल्या.
बालके कुपोषित का आहेत, शेतकरी आत्महत्या का करीत आहेत, शेतकऱ्यांना खते, बियाणे वेळेवर मिळते का, त्यासाठी शेतकऱ्यांना भाजप नेत्यांच्या दुकानावर जावे लागते, असेही त्या म्हणाल्या.
मध्य प्रदेशात पाटबंधाऱ्यांसाठी वीज पुरविण्यात येत नाही,महिलांविरुद्धच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली आहे आणि जनतेमध्ये सुरक्षित असल्याची भावना राहिलेली नाही, असेही त्या म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 1:40 am

Web Title: bjp is double faced on combating corruption says sonia gandhi
Next Stories
1 काँग्रेस वाळवीसारखी: मोदींची टीका
2 काँग्रेस आणि‘आप’कडून अल्पसंख्याकांचे लांगूलचालन
3 कारसेवकांवर गोळीबाराचे मुलायम यांच्याकडून समर्थन
Just Now!
X