News Flash

‘जेएनयू’त देशद्रोही घोषणा देणाऱ्यांना भाजपचे संरक्षण- केजरीवाल

केजरीवाल यांनी बुधवारी सकाळी ट्विटरवरून यासंदर्भात भाष्य केले.

| March 16, 2016 01:00 pm

गुजरातमधील उनामध्ये गोरक्षक संघटनेच्या तरुणांनी चार दलित मुलांना अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष या घटनेकडे वळाले.

भारतातील देशद्रोही घटकांमध्ये भाजप हा सर्वाधिक देशद्रोही असल्याची टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर भाजपकडूनच जेएनयूमध्ये देशद्रोही घोषणा देणाऱ्यांना संरक्षण देण्यात येत असल्याचा आरोपही केजरीवालांनी केला. त्यांच्या या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांनी बुधवारी सकाळी ट्विटरवरून यासंदर्भात भाष्य केले. ९ फेब्रुवारी रोजी जेएनयूच्या आवारात देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणा या विद्यापीठाबाहेरच्या गटाने दिल्याची माहिती जेएनयू समितीच्या अहवालात समोर आली होती. यापूर्वीही केजरीवालांनी जेएनयू प्रकरणावरून भाजपवर तोंडसुख घेतले होते. काश्मीरमध्ये मित्रपक्ष असलेल्या ‘पीडीपी’च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती नाराज होऊ नयेत, यासाठीच भाजप जेएनयूतील खऱ्या देशद्रोह्यांना अटक करत नसल्याचे केजरीवलांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 1:00 pm

Web Title: bjp is most anti national of all tweets arvind kejriwal
Next Stories
1 गेल्या वर्षभरात संघाची अभूतपूर्व भरभराट; देशभरात ५००० नव्या शाखा
2 पाकिस्तानातील शक्तिशाली बॉम्बस्फोटात १५ ठार
3 पाकिस्तानच्या अनपेक्षित मदतीमुळे भारताला तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश
Just Now!
X