News Flash

भाजप जगातील सर्वात मोठा खंडणीखोर पक्ष- ममता

पूर्व मिदनापोर जिल्ह्यातील हल्दिया येथे एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

भाजप जगातील सर्वात मोठा खंडणीखोर पक्ष- ममता
(संग्रहित छायाचित्र)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढविला. भाजप हा जगातील सर्वात मोठा खंडणीखोर पक्ष असून त्या पक्षाला राज्यात कधीही सत्तेवर येऊ देऊ नये, असे आवाहन बॅनर्जी यांनी केले.

पूर्व मिदनापोर जिल्ह्यातील हल्दिया येथे एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या. भाजप हा दंगली घडवत असून लोकांची हत्या आणि दलित मुलींचा छळ करीत असल्याचा आरोपही या वेळी ममतांनी केला. भाजप हा जगातील सर्वात मोठा खंडणीखोर पक्ष आहे, पीएम केअर्स फंडाच्या नावाने त्या पक्षाने किती रक्कम गोळी केली आहे त्याकडे पाहा, पश्चिम बंगालमधील जनतेला शांतता आणि दंगलमुक्त राज्य हवे असेल तर तृणमूल काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे, असेही ममता म्हणाल्या.

लोकांच्या हत्या करण्यासाठी जो पक्ष दंगली घडवितो त्या पक्षाला राज्यात कधीही सत्तेवर येऊ देऊ नका, भाजपमधील महिलाही सुरक्षित नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या. भाजप लोकशाही पद्धतीने  निवडणुका लढू शकत नाही, धमक्या देऊनच त्यांचा उत्कर्ष झाला आहे, असेही त्या म्हणाल्या.  ममतांनी  नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्ला चढविला. मोदी यांनी सर्व काही विकले आहे, अर्थव्यवस्थेचा विनाश केला आहे. रेल्वे, कोळसा क्षेत्र, बीएसएनएल, बँका यांचे खासगीकरण केले जात आहे, एके दिवशी हल्दिया गोदीचीही त्यांनी विक्री केलेली असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या.

‘ईव्हीएम तपासा’

खेजुरी : मतदान करताना मतदारांनी दक्ष राहावे आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) दोनदा तपासणी करावी, असे आवाहनही ममतांनी मतदारांना केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2021 1:40 am

Web Title: bjp is the largest ransom party world west bengal chief minister mamata banerjee akp 94
Next Stories
1 लष्करी क्षेत्रात अमेरिका- भारत यांची मजबूत भागिदारी
2 इशरत जहाँ चकमकप्रकरणी तीन अधिकाऱ्यांविरुद्ध खटल्यास गुजरात सरकारची परवानगी नाही
3 ‘करोना लशीमुळे १० महिने संरक्षण’
Just Now!
X