News Flash

कोलकात्यात भाजपच्या आयटी विभाग सचिवाला अटक; बनावट व्हिडिओ प्रकरणी कारवाई

पश्चिम बंगालमधील हिंसाचारप्रकरणी तीसऱ्या व्यक्तीला अटक

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचारबाबत सोशल मीडियावरून बनावट व्हडिओ आणि छायाचित्र पोस्ट केल्याप्रकरणी भाजपचा आयटी विभाग सचिव तरूण सेनगुप्ता याला असंसोल येथून अटक करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ही करवाई केली. ९ जूलैपासून आत्तापर्यंत याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली ही तिसरी व्यक्ती आहे. सेनगुप्तावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजच त्याला न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.

या प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर प्रहार केला आहे. सोशल मीडियातून दिशाभूल करणारी बनावट छायाचित्रे पसरवून भाजपचा जातीय दंगली भडकावण्याचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी भाजपचा सोशल मीडियातून सुरू असलेल्या धुमाकुळाला पश्चिम बंगालच्या जनतेने थारा देता कामा नये, असे आवाहन बॅनर्जी यांनी येथे एका जाहीर सभेत बोलताना केले.

दरम्यान, या आठवड्यात दिल्ली भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात याप्रकरणी कोलकात्यात दोन अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आहे आहेत. शर्मा यांनी बसीरतमधील दंगलप्रकरणी राज्य सरकारच्या निषेधासाठी आंदोलनाचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. मात्र, त्यासाठी २००२ मधील गुजरात दंगलीतील जाळपोळीचे छायाचित्र वापरले होते.

दरम्यान, रविवारी कोलकाता पोलिसांनी एका हिंदू व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीने बसीरतच्या दंगलप्रकरणी माहिती प्रसारित करताना एका महिलेसोबत गैरवर्तन करणारे छायाचित्र पोस्ट केले होते. हे छायाचित्र एका भोजपूरी सिनेमातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे छायाचित्र अनेक भाजप नेत्यांनी शेअर केले होते.

याप्रकरणी बसरीरतमध्ये जातीय दंगल कशी भडकली याबाबत चौकशीसाठी कोलकाता उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली न्यायलयीन समिती नेमण्यात आल्याचे ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 1:08 pm

Web Title: bjp it cell secretary arrested by cid in west bengal regarding fake video posting about basirat communal violence
Next Stories
1 चीनमध्ये सर्वात मोठी सैन्य कपात; तब्बल १३ लाख सैनिकांना देणार नारळ
2 माजी आमदाराच्या मुलीची गुंडगिरी, विद्यार्थिनीला भरवर्गातच मारहाण
3 पासपोर्ट मिळणार फक्त ३ दिवसांत; पोलीस व्हेरीफिकेशनसाठी मोबाईल अॅप
Just Now!
X