15 January 2021

News Flash

‘पंतप्रधानपदासाठीची आमची निवड भाजपला माहिती आहे’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांची स्पष्टोक्ती

| September 8, 2013 01:04 am

राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांची स्पष्टोक्ती
पंतप्रधानपद उमेदवारीसाठी आमची कोणाला पसंती आहे? हे उघडच आहे परंतु, अंतिम निर्णय भारतीय जनता पक्षाचाच(भाजप) असेल असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकींसाठी भाजपच्या वतीने संभाव्य पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. लवकरच भाजप आपला पंतप्रधान पदासाठीचा उमेदवार जाहीर करण्याची चिन्हेही आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते मनमोहन वैद्य म्हणाले, “संघाने आपली भूमिका याआधीच भाजपसमोर स्पष्ट केली आहे. त्याबद्दलची पूर्णकल्पनाही भाजप कार्यकारिणीला देण्यात आली आहे. आता पंतप्रधानपदासाठीचा उमेदवार कोण आणि केव्हा जाहीर करायचा हे संपूर्णपणे पक्षावर अवलंबून आहे.”
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला पाठींबा आहे. परंतु, उमेदवार लवकरच जाहीर करावा यासंबंधिचा कोणताही दबाव संघाने भाजपवर ठेवलेला नाही. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2013 1:04 am

Web Title: bjp knows our pm choice rashtriya swayamsevak sangh
Next Stories
1 ‘माझे आणि मोदींचे स्वप्न एकच; ते कधीच पंतप्रधान बनू नयेत’
2 मोदी टीकास्त्र: जनता त्रस्त; काँग्रेस सुस्त
3 जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या वेळी यासिनसोबत कोण होते?
Just Now!
X