News Flash

केजरीवाल यांनी करोना मृतांची खरी आकडेवारी लपवली; दिल्ली भाजपाचा आरोप

करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस केजरीवाल यांनी आकडे लपवल्याचा दावा

सौजन्य- ANI

दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी पुन्हा एकदा करोना परिस्थितीवरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केलीय. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधांच्या बाता करता करता केजरीवाल सरकारने दिल्लीला प्रती १० लाख व्यक्तींमधील मृत्यूच्या यादीत आघाडीवर आणून दाखवण्याच काम केल्याची टीका गुप्ता यांनी केलीय. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी करोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या आकडेवारीमध्ये हेराफेरी केल्याचा आरोपही गुप्ता यांनी केलाय. केजरीवाल फेरफार करण्यामध्ये पारंगत असल्याचा टोला गुप्ता यांनी लगावला आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही केजरीवाल यांनी करोनामुळे मरण पावलेल्यांची खरी आकडेवारी लपवल्याचा दावा गुप्ता यांनी केलाय.

आदेश गुप्ता यांनी ठरवा आणि निवडा या आधारावर मुख्यमंत्र्यांनी मरण पावलेल्या करोना योद्ध्यांचा सन्मान केल्याचाही आरोप केलाय. मात्र दुसरीकडे शेकडो असे करोना योद्धे आहेत जे मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळण्याची वाट पाहत आहेत. तरी मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांची साधी दखलही घेतली नसल्याचा हल्लाबोल गुप्ता यांनी केलाय.

इतकच नाही तर दिल्लीमधील परिस्थिती चिंताजन असताना केजरीवाल यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला असंही गुप्ता यांनी म्हटलं आहे. आरोग्य व्यवस्थेच्या कमतरतांमुळे दिल्लीत रुग्ण मरत असतानाच दुसरीकडे केजरीवाल या परिस्थितीची जबाबदारी इतर कोणावर तरी ढकलण्याचा प्रयत्न करत होते. अन्य राज्यांच्या तुलनेत प्रती १० लाख व्यक्तींच्या हिशोबाने दिल्लीमध्ये सर्वाधिक मृत्यू झालेत, असं गुप्ता म्हणाले.

केरीवाल सरकारने पहिल्या लाटेच्यावेळेसही आकडे लपवल्याचा आरोप भाजपाच्या वतीने गुप्ता यांनी केला. दुसऱ्या लाटेच्या वेळेसही मुख्यमंत्र्यांनी मानवतेलाही लाजवेल अशी वागणूक दिल्लीकरांना देत मृतांचा खरा आकडा लपवल्याचा दावा गुप्तांनी केलाय. दिल्ली सरकारच्या आकडेवारीनुसार एका दिवसात दिल्लीत ४५० हून अधिक जणांचा मृत्यू जालेला नाही. तर दुसरीकडे दिल्ली महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार एका दिवसात वेगवेगळ्या स्मशानभूमींवर एका दिवसात ७०० हून अधिक जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत, असं गुप्ता म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 4:54 pm

Web Title: bjp leader adesh gupta slams delhi cm arvind kejriwal over covid 19 death numbers scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 आंध्र प्रदेश: चमत्कारी औषधामुळे करोना बरा झाल्याचा दावा करणाऱ्या माजी मुख्याध्यापकाचा करोनामुळेच मृत्यू
2 सरकारवर टीका म्हणजे देशद्रोह नाही; सर्वोच्च न्यायालय पोलिसांवर कडाडले
3 लॉकडाउन ठरला जीवनरक्षक! फक्त करोनाच नाही, तर अन्य आजारांपासून वाचले कोट्यवधी लोकांचे प्राण
Just Now!
X