News Flash

पश्चिम बंगालमध्ये दोनशेहून अधिक जागा जिंकू : शहा

शनिवारी  पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पहिल्या टप्प्यात मतदान शांततेत पार पडले.

(संग्रहित छायाचित्र)

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला  दोनशेहून अधिक जागा मिळतील, असा विश्वास भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त के ला आहे.

ते त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधत होते. शनिवारी  पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पहिल्या टप्प्यात मतदान शांततेत पार पडले. त्यानंतर कार्यकत्र्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बंगालमध्ये भाजपची भगवी लाट आल्याचे संके त मिळाले. पहिल्या टप्प्यात तेथे ३६  जागांवर मतदान झाले. त्यापैकी २६ जागा भाजपला मिळेल आणि इतर टप्प्यात २९४ सदस्यीय पश्चिम बंगालमध्ये भाजपला २०० हून अधिक जागा मिळतील, असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 12:17 am

Web Title: bjp leader and union home minister amit shah let win more than two hundred seats in west bengal akp 94
Next Stories
1 ध्रुवीकरणाच्या राजकारणावर विश्वास नाही – राजनाथ सिंह
2 ‘होली की शुभकामनाये’ असे म्हणत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मोदींना दिल्या शुभेच्छा
3 तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या पाया पडताना पाहणे असह्य, राहुल गांधी यांची टीका
Just Now!
X