News Flash

भाजपा नेत्याला दारूची तस्करी करताना अटक

तीन गाड्यांसह सहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

आंध्र प्रदेशातील भाजपा नेते जी. रमणजानियुलु उर्फ अंजी बाबू यांना ईडीने दारूची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली आहे. अंजी बाबू यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत माचीलीपट्टनम मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती.

तेलंगणातून आंध्र प्रदेशात उत्पादन शुल्क न भरलेल्या दारूची तस्करी करत असताना अंमलबजावणी संचलनालयाने अटक केलेल्या चार जणांमध्ये त्यांचाही समावेश होता.

तीन गाड्यांसह सहा लाख रुपये किंमतीच्या उत्पादन शुल्क न भरलेल्या दारूच्या बाटल्यांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तेलंगणाच्या नीलगोंडा जिल्ह्यातील चिटीला येथून आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे तस्करी केलेली दारू आणली जात होती.

भाजपा नेत्यांसह अन्य तीन जणांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे अशी माहिती आंध्र प्रदेश ईडीच्या अधिकाऱ्याने दिली. इंडिया टुडेने या संदर्भात वृत्त दिले आहे.

या प्रकरणानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी अंजी बाबू यांना पक्षातून हकालपट्टी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 3:56 pm

Web Title: bjp leader arrested for smuggling liquor abn 97
Next Stories
1 श्याम रजक यांनी पाठ फिरवताच जदयूनं दिला राजदला धक्का; तीन आमदार करणार पक्षप्रवेश
2 मलेशियात आढळला नवीन करोना विषाणू ; १० पट अधिक वेगाने होतोय संसर्ग
3 करोनाची स्थिती कायम; ‘या’ राज्यानं ६ सप्टेंबरपर्यंत वाढवला लॉकडाउन
Just Now!
X