03 March 2021

News Flash

“मुखवटे बदलले तरी चेहरे तेच, डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच”; भाजपाचा विरोधकांवर निशाणा

नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक

तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकरी संघटनांनी मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिली. त्यास विरोधकांनी पाठिंबा दिला. दरम्यान, यावरून भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

“मुंबईतील गिरणी कामगारांना कोणी संप करायला लावला…? कोणी कामगारांना फसवलं..? कोणी कामगारांना उद्ध्वस्त केलं..? कोणी मालकांचे फायदे करुन दिले..? माझ्या शेतकरी बांधवानो, तुम्ही आठवा थोडे मागचे, मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत,डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत,” असं म्हणत शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली.

आणखी वाचा- शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांचा आजचा बंद, भाजपाची टीका

“काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात महाराष्ट्रात शेती विषयक सुधारणा कायदा झाला. त्या सुधारणा आता देशपातळीवर झाल्या तर विरोध का?, काँग्रेसने स्वतः जे केले त्या विरोधातच भारत बंद?, काँग्रेसच्या फसवणुकीला शेतकऱ्यांनी बळी पडू नये! काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात महाराष्ट्रात शेती विषयक सुधारणा कायदा झाला. त्या सुधारणा आता देशपातळीवर झाल्या तर विरोध का?,” असे सवालही शेलार यांनी केला.

आणखी वाचा- नवे कृषी कायदे रद्द करू नका, हरयाणातील काही शेतकरी संघटनांचं कृषीमंत्र्यांना पत्र

हरयाणातील शेतकऱ्यांनी घेतली कृषीमंत्र्यांची भेट

सोमवारी काही शेतकरी संघटनांनी कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या काही संघटनांनी नव्या कृषी कायद्यांचं समर्थन केलं. तसंच यासंदर्भात एक पत्रदेखील कृषीमंत्र्यांना देत नवे कायदे रद्द न करण्याची मागणी करण्यात आली. हरयाणातील शेतकरी काही शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सोमवारी कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांकडे लक्ष देत त्या नव्या कायद्यांमध्ये सामील केल्या जाव्या असं या संघटनांचं म्हणणं होतं. पीएफओ आणि प्रगतीशील शेतकरी संघटना या एमएसपी आणि बाजार समित्यांच्या बाजूनं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 10:27 am

Web Title: bjp leader ashish shelar criticize opposition on farmers protest bharat bandh live updates jud 87
Next Stories
1 भारतीय वंशाचे अनिल सोनी WHO फाऊंडेशनचे पहिले सीईओ
2 “एलियन्सच्या अस्तित्वाबद्दल ट्रम्प खुलासा करणार होते पण एलियन्स म्हणाले…”; नव्या दाव्याने खळबळ
3 शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांचा आजचा बंद, भाजपाची टीका
Just Now!
X