News Flash

“… त्या ३६ ब्रिटिश खासदारांना अजूनही भारतावर इंग्लंडच्या राणीचे राज्य असल्याचे वाटत असावं”

भाजप नेत्याचा टोला

भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला ब्रिटनमधील ३६ खासदारांनी पाठिंबा दिला आहे. ब्रिटनमधील लेबर पार्टीचे खासदार तनमनजीत सिंग धेसी यांच्या नेतृत्वाखाली ३६ ब्रिटिश खासदारांनी युनायटेड किंगडमचे सचिव डोमिनिक राब यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी कृषी कायद्यांविरोधात भारतावर दबाव टाकण्याची मागणी केली आहे. “त्यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ परराष्ट्र मंत्रालय आणि युकेच्या कार्यालयांमार्फत भारत सरकारशी चर्चा करावी,” असं खासदारांच्या गटाने रॉब यांना म्हटलं आहे. दरम्यान, यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

“भारतात चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत चिंता व्यक्त करणारे पत्र लिहिणार्‍या ३६ ब्रिटिश खासदारांना अजूनही भारतावर इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीचे राज्य असल्याचे वाटत असावे. आमचे प्रश्न सोडवण्यास आम्ही समर्थ आहोत. जंटलमन, माईंड युअर ओन बिझनेस,” अशी प्रतिक्रिया भातखळकर यांनी दिली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर टीका केली.

काय आहे प्रकरण?

“गेल्या महिन्यात अनेक खासदारांनी आपल्याला तसेच लंडनमधील भारतीय उच्चायोगाला भारतातील शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या तीन कृषी कायद्यांबाबत लिहिलं होतं. केंद्र सरकारने करोनाच्या काळात आणलेले हे तीन कृषी कायदे शेतकऱ्यांचे शोषण थांबवणे आणि त्यांच्या पीकांना योग्य मोबदला देण्यास अपयशी ठरल्याबद्दल देशभरात व्यापक स्वरुपात शेतकरी निषेध आंदोलन करत आहेत,” असं तनमनजीत सिंग म्हणाले.

ब्रिटिश सरकारकडे करण्यात आलेल्या मागण्या

१) पंजाबमध्ये बिघडत चाललेली परिस्थिती आणि केंद्राशी असलेला याचा संबंध यासाठी एका महत्त्वाच्या बैठकीची मागणी करण्यात आली आहे.
२) भारतात जमीन आणि शेतीसाठी मोठ्या काळापासून जोडलेल्या ब्रिटिश शीखांसाठी आणि पंजाबींसाठी भारतीय अधिकाऱ्यांशी आपण चर्चा करावी.
३) भारतीय परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगलांसोबत युके, परराष्ट्र आणि विकास कार्यालयांमार्फत चर्चा केली जावी.

या खासदारांनी दिलं समर्थन

भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना ज्या ब्रिटिश खासदारांनी पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामध्ये डेबी अब्राहम, मार्टिन डॉकर्टी ह्युजेस, एलन डोरांस, अँड्रूयू ग्वेने, अफजल खान, इयान लावेरी, इमा लावेरी, क्लाइव लेविस, टोनी लॉयड, खालिद महमूद, सीमा मल्होत्रा, स्टीव मॅककेब, डॉन मैकडोनेल, पॅट मॅकफेडेन, ग्राहम मोरिस, कार्लेइन नॉर्स आदींचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 3:37 pm

Web Title: bjp leader atul bhatkhalkar criticize 36 mps united kingdom on farmers protest in india pm narendra modi jud 87
Next Stories
1 लसीचा डोस घेतल्यानंतरही करोना का झाला?; भारत बायोटेकनं दिलं स्पष्टीकरण
2 भारतातील शेतकरी आंदोलनाला ३६ ब्रिटिश खासदारांचा पाठिंबा; युकेच्या सचिवांना लिहिलं पत्र
3 करोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही- WHO
Just Now!
X