News Flash

“नेहरु नसते तर चीनची समस्याच नसती”; भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

चर्चासत्रादरम्यान केलं वादग्रस्त वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यात ताबारेषेवर तणाव वाढला आहे. सैनिकी पातळीपासून मुत्सद्दी पातळीपर्यंत दोन्ही देशांमधील वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान सीमेवर निर्माण झालेल्या तणावाबाबत एका वृत्तवाहिनीवर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु यादरम्यान भाजपा नेते संबित पात्रा यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. जर नेहरू नसते तर आज चीनची समस्याच राहिली नसती, असं ते बोलताना म्हणाले.

हिंदी वृत्तवाहिनीवर एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काँग्रेसकडून पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा हे सहभागी झाले होते. तर भाजपाकडून चर्चासत्रात संबित पात्रा हे सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान, खेडा यांनी संबित पात्रा यांना घेरण्याचा प्रयत्न केला. “जर मोदी सरकारनं योग्य रणनिती आखली असती तर गलवानमध्ये जी घटना घडली ती घडली नसती,” असं खेडा म्हणाले.

आणखी वाचा- …म्हणून चीन इतका आक्रमक झाला – राज्यवर्धन राठोड

“जर पंडित नेहरू नसते तर आज चीनचा प्रश्नच निर्माण झाला नसता. हे सर्व त्यांच्यामुळे होत आहे. त्यावेळी ते आपला वाढदिवस साजरा करत होते. दोन चार दिवसांत पत्रकार परिषद घेऊन सर्वकाही समोर आणू,” असं प्रत्युत्तर पात्रा यांनी खेडा यांना दिलं.

आणखी वाचा- आता कूटनीती, भारत-चीन सीमावादावर महत्त्वाची बैठक

संबित पात्रा यांनी स्वत: या चर्चासत्रातील ही क्लिप आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली. त्यावरही खेडा यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांना प्रत्युत्तर दिलं. “जर नेहरू नसते तर आज तुम्ही सर संबित पात्रा असता आणि नरेंद्र मोदी हे राय बहादुर नरेंद्र मोदी असते. आजही इंग्रजांच्या गुलामगिरीच्या रंगात रंगला असता,” असं ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 3:53 pm

Web Title: bjp leader criticize former pm jawaharlal nehru india china border debate congress pawan kheda jud 87
Next Stories
1 सहकारी बँकांतील ठेवींसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय
2 …म्हणून चीन इतका आक्रमक झाला – राज्यवर्धन राठोड
3 सूरत : पोलीस अधिकाऱ्याची महिला बँक कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, गुन्हा दाखल
Just Now!
X