05 August 2020

News Flash

भाजप नेत्याची प्रियांका गांधींविरोधात न्यायालयात तक्रार

बिहारमधील भाजप नेत्याने मोदींविरोधात 'नीच राजकारण' वक्तव्याबद्दल प्रियांका गांधी यांच्याविरोधात स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

| May 7, 2014 05:38 am

बिहारमधील भाजप नेत्याने मोदींविरोधात ‘नीच राजकारण’ वक्तव्याबद्दल प्रियांका गांधी यांच्याविरोधात स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.
बिहार भाजपचे सचिव सुरजनंदन मेहता यांनी न्यायदंडाधिकारी रमाकांत यादव यांच्यासमोर प्रियांका गांधी यांचे वक्तव्य म्हणजे निष्काळजीपणाचा कळस असून गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणारं असल्याचा आरोप केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या(गुरूवार) यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सुरजनंदन मेहता यांची कलम १५३(अ) आणि १५३(ब) (गटांमधील शत्रुत्वाला बढावा देणे), कलम १७१(जी) (निवडणूकीला अनुसरून खोटी विधाने करणे), कलम ५०० बदनामी करणे आणि कलम ५०४ (बदनामीच्या हेतूने मुद्दाम आक्षेपार्ह वक्तव्य करणे) याअंतर्गत तक्रार दाखल करून घेतली आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2014 5:38 am

Web Title: bjp leader files complaint in court against priyanka gandhi
Next Stories
1 पंतप्रधानांना निवृत्तीचे ‘गिफ्ट’: नवीन घरात विनामूल्य पाणी आणि वीज!
2 इशरत चकमकप्रकरणी अमित शहा निर्दोष
3 ‘पाळत’ ठेवल्याबद्दल मी ऋणी आहे’
Just Now!
X