05 July 2020

News Flash

ट्विटरवरून भाजपा शब्द हटवण्याच्या चर्चांवर ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोडलं मौन; म्हणाले…

त्यांच्या ट्विटर प्रोफाईलचा एक फोटो झाला होता व्हायरल

भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे पुन्हा एकदा चर्चेत आले होते. सोशल मीडियावर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ट्विटर प्रोफाईलचा एक स्क्रिनशॉट व्हायरल होत होता. तसंच यामध्ये त्यांनी आपल्या प्रोफाईलवरू भाजपा असं लिहिलेल काढल्याचा दावाही करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपातही नाराज आहेत का? अशा चर्चांना यामुळे उधाणही आलं होतं. यावर एका वाक्यात बोलत त्यांनी अखेर मौन सोडलं आहे.

“चुकीच्या बातम्या सत्यापेक्षा अधिक वेगानं पसरतात,” असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ट्विटर अकाऊंटचा जो फोटो व्हायरल होत होता त्यामध्ये त्यांनी जनतेचा सेवक आणि क्रिकेट प्रेमी असं लिहिलं होतं. यातून त्यांनी भाजपा हा शब्द हटवल्याचा दावा काही जणांकडून करण्यात येत होता. परंतु त्यांनी काँग्रेसमध्ये असतानाच आपल्या प्रोफाईलवर जनतेचा सेवक आणि क्रिकेट प्रेमी लिहिलं होतं असा दावा मध्यप्रदेशातील मंत्री तुलसी सिलावत यांनी केला होता. काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या काही महिन्यांपूर्वीच त्यांनी आपल्या अकाऊंटवरून काँग्रेसची ओळखही हटवली होती. त्यानंतर त्यांनी कधीही आपल्या प्रोफाईच्या बायोवर कोणताही बदल केला नसल्याचं सांगण्यात आलं होतं.

मध्यप्रदेशातील मंत्री तुलसी सिलावत यांनीदेखील यावर ट्विट करत माहिती दिली होती. “काँग्रेसच्या जनतेविरोधातील धोरणांमुळे कंटाळून ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या प्रोफाईवरून काँग्रेसची ओळख काढून टाकली होती. त्यानंतर त्यांनी जनतेचा सेवक आणि क्रिकेट प्रेमी असंच लिहिलं होतं. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या एका निर्णयानं काँग्रेसची प्रोफाईल तर बिघडवली. पण आता एवढं भीतीचं वातावरण पसरलं आहे की काँग्रेसचे लोकं आता स्वप्नातही त्यांच्याबाबत अफवा पसरवू लागले आहेत,” असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. यापूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी २५ नोव्हेंबर २०१९ रोजी आपल्या ट्विटर प्रोफाईलमध्ये बदल केला होता. त्यांनी काँग्रेस महासचिव, खासदार (२००२-२०१९) आणि माजी केंद्रीय मंत्री याऐवजी जनतेचा सेवक आणि क्रिकेट प्रेमी असं लिहिलं होतं. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2020 10:20 pm

Web Title: bjp leader jyotiraditya scindia clarifies news removing bjp from his tweeter account jud 87
Next Stories
1 चीनविरोधात अमेरिकेसह आठ देश एकवटले; तयार केली नवी आघाडी
2 “पुढील दोन ते तीन महिन्यात करोनावर लस येण्याची शक्यता”
3 भोपाळ : देवळात सॅनिटायजरचा वापर करण्यास पुजाऱ्यांचा विरोध, दारु असल्याचं दिलं कारण
Just Now!
X