20 January 2021

News Flash

भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांचा भीषण अपघात, टँकरने दिलेल्या धडकेत कारचा चेंदामेंदा

पोलीस सध्या या प्रकरणी तपास करत आहेत

भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. टँकरने खुशबू सुंदर यांच्या कारला धडक दिली असून कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. बुधवारी सकाळी हा अपघात झाला असून सुदैवाने खुशबू सुंदर बचावल्या आहेत. खुशबू सुंदर यांना कोणतीही जखम झालेली नाही. पोलीस सध्या या प्रकरणी तपास करत आहेत.

अपघातानंतर खुशबू सुंदर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “टँकरने मला धडक दिली हे समजून घेण्याची प्रसारमाध्यमांना विनंती आहे. माझी कार उजव्या बाजूच्या लेनमधून जात असताना हा टँकर अचानक आला आणि धडक दिली. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत असून चालकाची चौकशी करत आहेत”.

तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुशबू सुंदर भाजपाच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.

अपघातानंतर खुशबू सुंदर यांनी पुढील प्रवास सुरु ठेवला. संपूर्ण चूक टँकर चालकाची होती, आपली नाही हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 10:46 am

Web Title: bjp leader khushbu sundar met with an accident sgy 87
Next Stories
1 गुजरातमध्ये दोन ट्रकची धडक होऊन भीषण अपघात, ११ जणांचा मृत्यू
2 करोनानंतर आता ‘चापरे व्हायरस’ची दहशत; या विषाणूने साथीचं रुप धारण केल्यास…
3 देशभरात २४ तासांत ४४ हजार ७३९ जण करोनामुक्त, ३८ हजार ६१७ नवे करनोबाधित
Just Now!
X