03 June 2020

News Flash

मोदी सरकारनं नोटबंदी केली नाही, नोटा बदलून दिल्या; भाजपा नेत्याचा दावा

अर्थतज्ज्ञांना सोडा, मनोज तिवारी अर्थतज्ज्ञाला विचारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री नोटाबंदीचा निर्णयाची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयावर अजूनही टीका होत आहे. विशेषतः नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाल्याचं अर्थतज्ज्ञांकडून सातत्यानं सांगितलं जात आहे. मात्र, भाजपाच्या नेत्यानं नोटबंदी केल्याच्या निर्णयाला नकार दिला आहे. ‘मोदी सरकारनं नोटबंदी केली नव्हती, तर नोटाबदलून दिल्या,’ असा दावा भाजपाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी केला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. 8 फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान होत असून, 11 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीत बाजी मारण्यासाठी भाजपा, आप आणि काँग्रेसनं जोर लावला आहे. प्रचारात एकमेकांवर आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. केंद्रात सत्तेत असलेली भाजपा, दिल्लीतील सत्ताधारी असलेली आप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत दिल्लीत बघायला मिळत आहे.

दरम्यान, प्रचारात धुमाळीत भाजपाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांनी चक्क मोदी सरकारनं नोटाबंदी केल्याचा इन्कार केला आहे. ‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत तिवारी यांनी हा दावा केला आहे. नोटबंदीच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना खासदार मनोज तिवारी म्हणाले, “नोटबंदी झाल्यानंतर लोकांना अडचणी आल्या, त्रास झाला. पण, नोटबंदी करण्यामागे जो उद्देश होता, तो खूप मोठा होता. उद्देश पूर्ण झाला,” असं त्यांनी सांगितलं. त्यावर मोदी सरकारनं नियुक्त केलेल्या गव्हर्नर ऊर्जित पटेल, देशाचं अर्थ मंत्रालयाला नोटबंदीसंदर्भात जे उद्दिष्ट्यं ठेवण्यात आली, त्याविषयी कोणतेही आकडे ठेवू शकलेले नाही. सर्व अर्थतज्ज्ञांनी सांगितलं होतं की अर्थव्यवस्थेला झटका बसेल, तो बसला. मागील दोन दशकांच्या तुलनेत देशाचा जीपीडी नीचांकी पातळीवर गेला आहे,” असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना मनोज तिवारी म्हणाले,”खरं सांगायचं तर ती नोटबंदी नव्हती. नोटाबदल होता. जुन्या नोटा द्या, नव्या नोटा मिळणार अशी ती योजना होती. नोटबंदी हा चुकीचा अर्थ लावण्यात आला. ज्यांच्याकडे चुकीच्या मार्गानं पैसा होता, त्यांच्यासाठी ही समस्या होती. ज्यांच्याकडे योग्य मार्गानं त्यांच्यासाठी रांगेत उभं राहणं हीच अडचण होती. शाहीन बागमध्ये असलेल्या प्रवृत्तीच्या लोकांना नोटबंदीचा त्रास झाला. सरकारच्या सर्व लोक कल्याणकारी योजनांसाठी नोटबंदीचा खूप फायदा झाला,” असा दावा तिवारी यांनी केला.

अर्थतज्ज्ञांना सोडा, मनोज तिवारी अर्थतज्ज्ञाला विचारा

“नोटबंदीमुळे काय फायदा झाला हे कोणताही अर्थतज्ज्ञ सांगत नाहीये. जीडीपी का इतका कोसळला,” असा प्रश्न मनोज तिवारी यांना विचारण्यात आला. तिवारी म्हणाले, “त्या अर्थतज्ज्ञांना सोडा, मनोज तिवारी अर्थशास्त्रज्ञाचं ऐका. जीपीडी कोसळण्याला इतर गोष्टी कारणीभूत आहेत. पूर्ण जगाचीच जीडीपी घसरली आहे. संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या फेऱ्यात अडकले आहे आणि भारत अजूनही टिकून आहे. नोटबंदीमुळे दहशतवादावर मोठा घाव बसला आहे. नकली नोटा येण बंद झालं. त्यांना नोटाच बदलता आल्या नाहीत,” असंही तिवारी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2020 11:41 am

Web Title: bjp leader manoj tiwari answered on note ban decision bmh 90
Next Stories
1 शाहीन बाग: थंडीमुळे चार महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यु; आई-वडिलांचा निर्धार कायम
2 Delhi Assembly Election 2020: दिल्लीचे तख्त केजरीवालच राखणार, भाजपा आणि काँग्रेसचा होणार सुपडा साफ?
3 पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर पतीने बॉम्बने उडवलं घर
Just Now!
X