News Flash

“एका कुटुंबाला खुश ठेवण्याची किंमत…”; भाजपा नेत्याचा काँग्रेसवर हल्लाबोल

यापूर्वीही त्यांनी काँग्रेसवर केला होता हल्लाबोल

सध्या राजस्थानमध्ये राजकीय नाट्य सुरू आहे. अशातच काही दिवसांपूर्वी एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर शेखावत हे सतत काँग्रेसवर हल्लाबोल करताना पाहताना दिसत आहेत. बुधवारी त्यांनी काँग्रेस कुटुंबीयांवर हल्लाबोल केला. एका कुटुंबाला खुश ठेवण्याची किंमत संपूर्ण देशानं फेडली आहे, असं म्हणत त्यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांवर हल्लाबोल केला.

यापूर्वीही शेखावत यांनी काँग्रेसवर टीकेचे बाण सोडले होते. मंगळवारीदेखील त्यांनी एक ट्विट करत काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. “ही वेळ करोनासोबत लढण्याची होती आणि तुम्ही अंताक्षरी खेळत बसलात. ही वेळ गरीबांना अन्न देण्याची होती, तुम्ही इटालियन शिकायला लागलात. राजस्थान सतर्क आहे आणि सर्व पाहत आहे,” असं शेखावत म्हणाले होते. शेखावत हे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाद्वारे गेहलोत सरकारवर टीका करताना दिसत आहेत.

आणखी वाचा- राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीचा छापा

आणखी वाचा- काँग्रेस हायकमांडकडून अशोक गेहलोत यांची कानउघडणी

काँग्रेसच्या आमदारांचे चित्रपट पाहतानाचे फोटो समोर आले होते. त्यावरुनही त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. “टोंक, अलवर, जयपूर, रामगढ आणि जालोरमध्ये घटलेल्या बलात्काराच्या आणि हत्येच्या घटना या मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. परंतु गेहलोत हे आपल्या आमदारांसह हॉटेल फेयरमोंटमध्ये मुगल ए आझम पाहण्यात व्यस्त आहेत. हे निंदनीय आहे,” असंही ते यापूर्वी म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 1:07 pm

Web Title: bjp leader minister criticize slams congress gandhi family scarifies everything for them jud 87
Next Stories
1 सोनं पहिल्यांदाच 50 हजारांपार, चांदीच्या दरानेही गाठला नवा उच्चांक
2 मध्य प्रदेश : लॉकडाउनदरम्यान खाणीत काम करताना सापडला हिरा, किंमत पाहून व्हाल थक्क
3 LAC वर निर्माण झाली कोंडी, चीन बरोबर पुढच्या बैठकीची नाही खात्री
Just Now!
X