करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत गरीब आणि गरजू लोकांसाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहेत. काही लोक कोणताही गाजावाजा न करता लोकांना मदत करताना दिसत आहेत. तर काही जण आपण करत असलेल्या मदतीचे फोटो टाकताना दिसत आहेत. नुकतंच भाजपाच्या एका नेत्यानं लोकांना केलेल्या मदतीचा एक फोटो शेअर केला आहे. भाजपाचे माजी खासदार परेश रावल यांनी त्यांचा फोटो शेअर करत त्यावर टीका केली आहे.

परेश रावल यांनी गुरूवारी संध्याकाळी एक फोटो शेअर केला आहे. ‘आलू एक दर्जन, दयालु दो दर्जन’ असं परेश रावल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. त्यांनी जो फोटो शेअर केला आहे तो भाजपाचे खासदार सत्यदेव पचौरी यांचा आहे. उत्तरप्रदेश मधील कानपूर लोकसभा क्षेत्रातून ते निवडून आले आहेत. काही लोकांना बटाटे देत असताना त्यांनी काढलेला फोटो परेश रावल यांनी शेअर केला आहे.

आणखी वाचा- केंद्र सरकारचा राज्यांशी संवाद नाही; मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा गौप्यस्फोट

या फोटोमध्ये अन्यकाही कार्यकर्ते आहेत. त्यांच्यापैकी काही कार्यकर्त्यांनी मास्कही परिधान केलेलं नाही किंवा कोणी गोव्ह्जही घातलेले नाहीत. तर फोटो काढताना अनेकांनी आपले मास्कही काढलेले दिसत आहे. परेश रावल यांनी हा फोटो शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे.