27 February 2021

News Flash

“यांच्या डोक्यावर सॅनिटायझर टाका, हे मला वेडं करतील;” भाजपा नेत्याची विनंती

एका चर्चेदरम्यान पात्रा यांचा राग अनावर झाला.

भाजपा नेते संबित पात्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एका वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ते समोरील व्यक्तीवर भडकले. यावेळी त्यांनी रागाच्या भरात त्यांच्या डोक्यावर सॅनिटायझर टाकलं पाहिजे, नाहीतर हे गोंधळ घालून सर्वांना वेडं करतील, असं म्हटलं. एका वृत्तवाहिनीवर शाहीन बागमधील आंदोलनावर चर्चा सुरू होती. त्यावेळी हा प्रकार घडला. करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता शाहीन बाग परिसर रिकामा करण्यात यावा या मुद्द्यावर ते बोलत होते. यावेळी हा प्रकार घडला.

याविषयावर चर्चा करण्यासाठी संबित पात्रा आणि महमूद पराचा उपस्थित होते. चर्चेदरम्यान, संबित पात्रा यांना प्रश्न विचारण्यात आला. ते उत्तर देत असतानाच मध्येच पराचा यांनी त्यांत व्यत्यय आणण्य़ाचा प्रयत्न केला. त्यावर संबित पात्रा यांचा राग अनावर झाला. त्यानंतर ते पराचा यांच्यावर भडकले.

त्यावेळी पात्रा यांनी अँकरला त्यांचा आवाज कमी करण्यास सांगण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी वाहिनीच्या कॅमेरामनला सॅनिटायझर त्यांच्या डोक्यावर ओतण्यास सांगितलं. त्यांना हातासोबतच डोकंही धुण्याची आवश्यकता आहे. हे काय बोलत आहेत आणि आम्ही त्यांना सहन करत आहोत, असंही ते यावेळी म्हणाले. तुम्ही आवाज कमी केला नाही तर आम्ही वेडे होऊ. करोना व्हायरसच्या चर्चेदरम्यानही कुस्तीचा आखाडा सुरू केला आहे, असंही ते रागावलेल्या स्वरात म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 12:44 pm

Web Title: bjp leader sambit patra got angry during tv show debate coronavirus shahin baugh jud 87
Next Stories
1 केरळ पोलिसांनी सांगितला करोना व्हायरसपासून वाचण्याचा उपाय
2 Coronavirus: …तर देशामध्ये ३३ लाख लोकांचा करोनामुळे मृत्यू होईल; इराणच्या संशोधकांचा इशारा
3 Coronavirus: चाचणी निगेटिव्ह; तरीही सुरेश प्रभूंनी घेतला एकांतवासात राहण्याचा निर्णय
Just Now!
X