27 September 2020

News Flash

मध्य प्रदेश : शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान

चौथ्यांदा ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

संग्रहित छायाचित्र

मध्य प्रदेशात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर भाजपानं अखेर आपलं सरकार स्थापन केलं आहे. भाजपाचे राज्यातील वरिष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी रात्री नऊ वाजता राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अवघ्या १८ महिन्यात ते पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत.

तत्पूर्वी, शिवराजसिंह चौहान यांना सोमवारी भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीत पर्यवेक्षक बनवण्यात आलेले भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मध्य प्रदेशचे प्रभारी विनय सहस्त्रबुद्धे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला रामराम करीत भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्या २२ समर्थकांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेसचे कमलनाथ सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर २२ मार्च रोजी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर दुसरीकडे भाजपाची सदस्य संख्या वाढल्याने सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ असल्याने भाजपाचे सरकार बनणार हे निश्चित झाले होते. नवे सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपालांनी कमलनाथ यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्र्याची जबाबदारी सोपवली होती.

दरम्यान, भाजपात प्रवेश केल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपाने मध्य प्रदेशातून राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 9:10 pm

Web Title: bjp leader shivraj singh chouhan takes oath as the chief minister of madhya pradesh aau 85
Next Stories
1 भारतात करोना व्हायरसवर प्रभावी ठरणारे ‘हे’ औषध वापरण्याची परवानगी
2 मास्क निर्यातबंदीला उशीर का?; राहुल गांधींनी कट-कारस्थानाचा व्यक्त केला संशय
3 करोना व्हायरसमुळे भारतात आणखी एक मृत्यू, आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू
Just Now!
X