05 December 2020

News Flash

उत्तर प्रदेशात भर बाजारात भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या

आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले होते

उत्तर प्रदेशात भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. फिरोजाबाद जिल्ह्यात भाजपा नेते डी के गुप्ता यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. डी के गुप्ता स्थानिक बाजारामधील आपलं दुकान बंद करुन जात असतानाच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

हल्ल्याची माहिती मिळताच कुटुंबीय आणि समर्थकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. यावेळी हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलकांनी आग्रा रोड अडवण्याचाही प्रयत्न केला. “काही अज्ञात लोकांनी भाजपा नेत्यावर हल्ला केला असून आम्ही तपास करत आहोत. आंदोलकांना शांत करण्यासाठी आम्ही चर्चा केली. पुढील २४ तासात या प्रकरणातील महत्वाचा पुरावा हाती येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” अशी माहिती पोलीस अधिकारी मुकेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

आणखी वाचा- उत्तर प्रदेशात पोलीस अधिकाऱ्यांसमोर भाजपा कार्यकर्त्याने गोळ्या घालून केली हत्या; योगी आदेश देत म्हणाले…

“दुकान बंद करत असतानाच त्यांच्यावर हल्ला झाला. कुटुंबीयांनी काही संशयितांची नावं दिली आहेत. आम्ही तपास करुन लवकरच आरोपींना अटक करु,” असं पोलीस अधिकारी शचिंद्रनाथ पटेल यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 9:10 am

Web Title: bjp leader shot dead in uttar pradesh sgy 87
Next Stories
1 शंभर नंबरी सोनं…नीट परीक्षेत मिळवले १०० टक्के गुण
2 करोनामधून बरे झाल्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा साधला चीनवर निशाणा, म्हणाले…
3 “कोणीही शूट करणार नाही,” जम्मू काश्मीरात नाट्यमय घडामोडींनंतर दहशतवाद्याचं आत्मसमर्पण, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X