News Flash

“आता CBI सगळ्यांना पवित्र करेल”; भाजपा नेत्याचं भर कार्यक्रमात वक्तव्य

बघा नक्की असं घडलं तरी काय...

सीबीआय, ईडी आणि इतर काही सरकारी यंत्रणा या स्वायत्त संस्था आहेत. त्यांची काम करण्याची स्वतंत्र कार्यपद्धती आहे. पण गेले काही महिने या यंत्रणांचा वापर मोदी सरकार आपल्या विरोधकांवर दबाव आणण्यासाठी आणि त्यांना संपवण्यासाठी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सातत्याने केला जातो आहे. महाराष्ट्रात सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी लागत असल्याने राज्यात ईडीला हाताशी घेऊ दबाव टाकला जातोय असं वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केलं. या साऱ्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये एका शो मध्ये भाजपाच्या प्रवक्त्याने थेट ‘आता CBI पवित्र करेल’, असं वक्तव्य केलं.

‘हिंदुहृदयसम्राट ते ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’…; ‘शिवशाही’च्या उर्दू कॅलेंडरवरून उद्धव यांना टोला

पश्चिम बंगालमध्ये यंदाच्या वर्षी निवडणुका आहेत. याच मुद्द्यावरून भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे नेते आमनेसामने आले. टीव्हीवरील एका शो मध्ये नेतेमंडळीना बोलवण्यात आलं होतं. बंगालमधील तृणमूल काँगेसच्या काही नेत्यांवर सीबीआयची कारवाई होत असल्याचा मुद्दा चर्चेसाठी उपस्थित झाला होता. या मुद्द्यावरून वाद सुरू झाला.

‘शिवशाही’ कॅलेंडरवर उर्दू भाषेतील मजकूर; फोटो ट्विट करत भाजपा नेता म्हणाला…

नुकतीच तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्यावर गोवंश तस्करीच्या प्रकरणात सीबीआयने कारवाई केली. या कारवाईबाबत तृणमूलचे नेते विनय गुप्ता यांनी भाजपा सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यांवरून भाजपाचे प्रवक्ते जफर इस्लाम यांनी विवेक गुप्तांना चांगलंच सुनावलं. “सीबीआय ही एक स्वायत्त संस्था आहे. मला या संस्थेचा आदर आहे. पण कधीकधी मला असा संशय येतो की या संस्थांना राजकीय चावी लावली जाते आहे”, असं तृणमूलचे गुप्ता म्हणाले.

मराठी मालिकेतल्या घरंदाज सुनेच्या ‘बोल्ड & सेक्सी’ लूकची चर्चा… पाहा Photos

यावर इस्लाम यांनी त्यांना उत्तर दिलं. “बंगालमध्ये काम करणारे भाजपाचे कार्यकर्ते परप्रांतीय आणि तृणमूलचे कार्यकर्ते भूमिपुत्र अशी एक नवी संकल्पना मांडली जात आहे. पण तृणमूल काँग्रेसने आता एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचे जाण्याचे दिवस आले. जाताजाता एक चांगलं काम करून जा.. ते म्हणजे ज्या गुन्हेगारांना तुम्ही संरक्षण दिलं आहे त्यांना पाठिशी घालू नका. आणि प्रश्न राहिला सीबीआयचा… सीबीआय स्वतंत्र संस्था आहे. ते त्यांचं काम योग्यप्रकारे करतील. आता सगळ्यांना पवित्र व्हावं लागेल आणि ते काम सीबीआयच करेल”, असं वक्तव्य त्यांनी कार्यक्रमात केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 2:50 pm

Web Title: bjp leader spokesperson comment on cbi interference in politics warning to opposition in live debate tv show vjb 91
Next Stories
1 “मोदी पंतप्रधान आहेत तोपर्यंत बिनधास्त…”, भाजपा नेत्याचा राहुल गांधींना टोला
2 भारतासाठी धोक्याचा इशारा, चीन पोहचला अरुणाचलच्या सीमेजवळ; तिबेटला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचं काम पूर्ण
3 “मान आणि सन्मानाने लढणाऱ्या शेतकऱ्यांसोबत…,” राहुल गांधींनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा
Just Now!
X