News Flash

भाजपा नेत्याच्या कार्यकर्त्यांकडून गँगरेपची धमकी, काँग्रेस महिला सचिवाचा आरोप

भाजपाकडून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होतो आहे असेही दिया शेटकर यांनी म्हटले आहे

दिया शेटकर- फोटो सौजन्य एएनआय

भाजपा नेते सुभाष शिरोडकर यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला गँगरेपची धमकी दिल्याचा आरोप दिव्या शेटकर यांनी केला आहे. दिया शेटकर या गोवा प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव आहेत. या संदर्भात त्यांनी पोलिसातही तक्रार नोंदवली आहे.  एवढेच नाही तर आपल्याला जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आल्याचे दिया शेटकर यांनी म्हटले आहे. सुभाष शिरोडकर हे गेल्याच महिन्यात भाजपामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांना गोवा सरकारने इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक पद दिले आहे.

सुभाष शिरोडकर यांच्या कार्यकर्त्यांवर दिया शेटकर यांनी आरोप केला आहे की त्यांनी आपल्याला जीवे मारण्याची आणि गँगरेपची धमकी दिली. मला त्यासंदर्भातले फोन येत असल्याचेही शेटकर यांनी म्हटले आहे. रविवारी सकाळी एका अनोळखी क्रमांकावरून मला धमकी देण्यात आली होती असेही त्यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. शिरोडा क्षेत्रात तुम्ही शिरोडकरांविरोधात आवाज उठवाल तर याद राखा असेही धमकी देणाऱ्याने आपणास बजावले असल्याचे शेटकर म्हटल्या आहेत.

भाजपा सरकारकडून आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होतो आहे. याप्रकरणी त्यांनी पणजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मला फोनवरून शिवीगाळ करण्यात आली. अर्वाच्य आणि उद्धट भाषेत माझ्याशी बोलले गेले असेही दिया शेटकर यांनी म्हटले आहे. या संदर्भात अजून शिरोडकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 12:02 pm

Web Title: bjp leader subhash shirodkars goons are threatening me of gangrape and killing says diya shetkar
Next Stories
1 अयोध्येत मशीद बांधल्यास हिंदू असहिष्णू होतील – उमा भारती
2 मध्य प्रदेशमध्ये भाजपा उमेदवाराचे निधन
3 …म्हणून मी निवासस्थानी गायींचे संगोपन करणार: मुख्यमंत्री
Just Now!
X