News Flash

रेशनच्या रांगेतही लोक मरू शकतात; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

लोकांना सध्यातरी त्रास होत आहे. पण मी असंवेदनशील नाही, असे ते म्हणाले.

डॉ. विनय सहस्रबुद्धे

नोटा बदलण्यासाठी बँकांसमोर लागलेल्या रांगा आणि त्यात काही ठिकाणी लोकांचे झालेले मृत्यू याबाबत बोलताना भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि मध्य प्रदेशचे प्रभारी विनय सहस्रबुद्धे यांनी वादग्रस्त विधान केले आहे. लोक रेशनसाठी लागलेल्या रांगांमध्येही मरू शकतात, असे सहस्रबुद्धे म्हणाले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वादळ उठले. पण आपण असे वक्तव्य केलेच नाही, ते चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी सध्या देशभरातील बँकांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एटीएमसमोरही पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी लागलेल्या रांगांमध्ये नागरिक मरणही पावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावरून विरोधी राजकीय पक्षांनी मोदी सरकार आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षाचे नेते मोदींवर टीका करत आहेत. अशातच पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे नेते विनय सहस्रबुद्धे यांनी असंवेदनशील वक्तव्य केले आहे. बँकांसमोर लागलेल्या रांगांमध्ये लोकांचा जीव जात आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, लोक रेशनच्या रांगेतही मरू शकतात. हे वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यांनी लगेच सारवासारव केली. लोकांना सध्यातरी त्रास होत आहे. पण मी असंवेदनशील नाही, असे ते म्हणाले. अशा प्रकारच्या घटना होतात. अनेकदा असे होते, असेही ते म्हणाले.

गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि हजारच्या नोटा बंद करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. मुंबईतील मुलुंडमधील हरिओम नगरमध्ये बँकेसमोरील रांगेत एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. तर मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातही बँकेच्या बाहेर लागलेल्या रांगेत ७० वर्षांचे वृद्ध चक्कर येऊन पडले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 1:03 pm

Web Title: bjp leader vinay sahasrabuddhe insensitive statement over note ban
Next Stories
1 सोने, हि-याचे व्यवहार केंद्राच्या रडारवर
2 बँकेतून एकदा पैसे काढल्यानंतर बोटावर शाई लावणार
3 नोटा बदलण्यासाठी मोदींची आई बँकेच्या दारी
Just Now!
X