कर्नाटकात सत्ता स्थापनेचा चांगलाच पेच निर्माण झाला असून भाजपाकडून सत्तेसाठी घोडेबाजार होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आपल्या आमदारांनी पक्षातून बाहेर पडू नये यासाठी काँग्रेसने त्यांना इलिंग्टन रिसॉर्ट येथे पाठवले होते. मात्र, या रिसॉर्टबाहेरील पोलिस बंदोबस्त हटवताच भाजपाचे नेते तिथे पोहोचले आणि त्यांनी काँग्रेसच्या आमदारांना पैशांची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते रामलिंगा रेड्डी यांनी केला आहे.


दरम्यान, घोडेबाजार रोखून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने आता आपल्या आमदारांना इलिंग्टन रिसॉर्ट येथून कर्नाटकाबाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला असून आमदारांची विविध ठिकाणी पाठवणीही करण्यात आली आहे. त्यानुसार, जेडीएसच्या आमदारांनी बंगळूरूंना शांग्रिला हॉटेलमधून बाहेर पडले आहेत. तसेच काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांना केरळातील कोची आणि काही जणांना आंध्रप्रदेशातील हैदराबाद येथे पाठवण्यात आल्याचे जेडीएसचे आमदार शिवरामे गौडा यांनी सांगितले.