दक्षिणेतील आणखी  एक राज्य काबीज

पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीत एन. आर. काँग्रेस-भाजप आघाडीला बहुमत मिळाले. गेली पाच वर्षे सत्ता भूषविलेल्या काँग्रेसचा दारुण पराभव झाला.

केंद्रशासित पुदुच्चेरी विधानसभेच्या ३० पैकी १५ पेक्षा अधिक जागा एन. आर. काँग्रेस -भाजप आघाडीने जिंकल्या. द्रमुक-काँग्रेस आघाडीला सात जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसमधील नाराजांना गळाला लावून पक्ष वाढविण्याचा प्रयत्न केलेल्या भाजपला पाच जागा मिळाल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मात्र पराभूत झाले.

पाच वर्षे सत्तेत असलेले नारायणस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-द्रमुक आघाडीचे सरकार आमदारांच्या फाटापुटीमुळे गेल्या फे ब्रुवारी महिन्यात गडगडले होते. भाजपने आमदार फोडल्याने सरकार पडले, असा आरोप करीत सहानुभूती मिऴविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. एन. रंगास्वामी हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत.

. कर्नाटक वगळता दक्षिणकडील अन्य राज्यांमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. पुदुच्चेरीत सत्तेत भागीदारी मिळणार असल्याने कर्नाटकपाठोपाठ पुदुच्चेरी या दक्षिणेकडील दुसऱ्या राज्यात भाजपला सत्तेत भागीदारी मिळेल.