03 December 2020

News Flash

आगामी निवडणुकांतील विजयासाठी भाजपचा दिल्लीत महायज्ञ

भाजप आमदार महेश गिरी यांनी पक्षाच्या विजयासाठी महायज्ञ करण्याचे ठरवले आहे

| January 15, 2018 03:37 am

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

लोकसभा निवडणुका अजून दूर असल्या तरी काहींना आताच या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची चिंता लागली असून दिल्लीचे भाजप आमदार महेश गिरी यांनी पक्षाच्या विजयासाठी महायज्ञ करण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे हा महायज्ञ मार्चमध्ये लाल किल्ल्याच्या जवळपास असलेल्या एका ठिकाणी करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

दिल्लीचे भाजप आमदार महेश गिरी हे या महायज्ञाचे संयोजक असून या महायज्ञास पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा तसेच भाजप राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. देशरक्षणासाठी ‘राष्ट्र रक्षा यज्ञ’ नावाखाली हा धार्मिक सोपस्कार केला जाणार असून त्यात लोकसभा व राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी बागलामुखी देवीचे आशीर्वाद घेतले जाणार आहेत. गिरी यांनी महायज्ञाच्या कार्यक्रमावर काही बोलण्यास नकार दिला असून २२ जानेवारीला सगळे सविस्तर सांगू असे म्हटले आहे. ‘आओ एक संकल्प लें, आओ एक आहुती दें’ हे या कार्यक्रमाचे घोषवाक्य असून या महायज्ञाची आखणी गिरी यांच्या घरी झालेल्या बैठकीत करण्यात आली. गिरी हे श्रीश्री रविशंकर यांचे शिष्य आहेत.

भाजपला राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यात सत्ता राखता यावी यासाठी महायज्ञ केला जाणार असून कर्नाटकात काँग्रेसकडून सत्ता खेचून घेण्याची शक्ती त्यामुळे भाजपला मिळेल असे संबंधितांना वाटते. या वर्षी या चार राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या विधानसभा निवडणुकांचा परिणाम २०१९ च्या निवडणुकांवर होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 3:37 am

Web Title: bjp maha yagya in new delhi ahead of 2019 lok sabha polls
Next Stories
1 जागतिक उत्पादन निर्देशांकात भारत तिसाव्या क्रमांकावर
2 कार्यपद्धती सुधारा!
3 ‘भारत माता की जय…’ घोषणा दिल्यामुळे कॉन्व्हेंट शाळेतून विद्यार्थ्यांना हाकलले
Just Now!
X