News Flash

भाजपाचा जाहीरनामा : …तर बिहारच्या जनतेला करोना लस मोफत देऊ

निर्मला सीतारामन यांच्या हस्ते प्रसिद्ध झाला जाहीरनामा

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. इतर अनेक आश्वासनांपैकी यंदा भाजपाने करोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला करोनाचा मोफत लस देण्यात येईल असं आश्वासनही आपल्या जाहीरमान्यात दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज साडे दहाच्या सुमारास बिहार निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

बिहार निवडणुकीसाठी भाजपाने ११ संकल्प असणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अगदी करोनाच्या लसीपासून ते रोजगार आणि अल्पबचत गटांपर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. आयसीएमआरने परवानगी दिल्यानंतर बिहारमधील सर्व व्यक्तींना करोनाचा लस मोफत दिली जाईल असं जाहीरमान्यात म्हटलं आहे.

बिहारमधील प्रत्येक नागरिकाला येथील राजकीय परिस्थितीचा योग्य अंदाज आहे. पक्षाने दिलेल्या आश्वासनांबद्दल त्यांना योग्य माहिती आहे. कोणी आमच्या जाहीरनाम्यासंदर्भात प्रश्न विचारल्यास आम्ही त्याला योग्य उत्तर नक्कीच देऊ शकतो. आम्ही जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने योग्य पद्धतीने पूर्ण केल्याचं आत्मविश्वासाने सांगू शकतो, असं सीतारामान यांनी यावेळी म्हटलं आहे.

काय काय आहे भाजपाच्या जाहीरनाम्यात

१) करोनाची लस आल्याबरोबर निःशुल्क देणार
२) मेडिकल/इंजिनिअरिंगचे शिक्षण हिंदी भाषेत देणार
३) ३ लाख शिक्षकांची भरती करणार
४) बिहारला आयटी हब बनवणार, ५ लाख रोजगार देणार
५) १ कोटी महिलांना स्वावलंबी बनवणार, मायक्रो फायनान्स संस्था उभ्या करणार
६) एक लाख लोकांना आरोग्य क्षेत्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध करुन देणार
७) दरभंगामध्ये २०२४ पर्यंत अखिल भारतीय आरोग्य संस्थानची उभारणी
८) धान्य आणि गहूसोबत सरकार डाळीही विकत घेणार
९) २०२२ पर्यंत ३० लाख लोकांना पक्की घर बांधून देणार
१०) गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात राज्य पहिल्या क्रमांकावर आणणार
११) दुग्ध उत्पादनासंदर्भातील १५ नवे उद्योग सुरु करणार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 11:09 am

Web Title: bjp manifesto promises free corona vaccination for people of bihar if voted to power scsg 91
Next Stories
1 देशात ६८ लाख नागरिक करोनामुक्त, २४ तासात ७९ हजार ४१५ रुग्णांना डिस्चार्ज
2 चिनी रणगाडे ‘नाग’च्या रेंजमधून नाही सुटणार, क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी
3 Happy Birthday: शेअर ब्रोकर अमित शाह ते शहेनशाह
Just Now!
X