News Flash

हनुमान चालिसा कार्यक्रमात सहभागी झाल्याने इशरत जहाँ यांना धमकी

इशरत जहाँ यांनी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे

हनुमान चालिसा कार्यक्रमात सहभागी झाल्याने इशरत जहाँ यांना धमकी

सर्वोच्च न्यायालयात तिहेरी तलाक प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्या भाजपा सदस्य इशरत जहाँ यांना हनुमान चालिसा वाचन कार्यक्रमात सहभागी झाल्याने धमकी देण्यात आली आहे. इशरत जहाँ यांनी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आपल्या धमकावण्यात आल्याचं तसंच गैरवर्तवणूक केल्याचं सांगितलं आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने आपल्या पतीचा भाऊ आणि घरमालक धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे

इशरत जहाँ यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजरा समर्थकांनी हावडा येथील एसी मार्केटमध्ये आयोजित केलेल्या ‘हनुमान चालिसा पाठ’ कार्यक्रमात सहभाग घेतला होता. बुधवारी आपण मुलाला शाळेतून घेऊन घरी जात असताना जवळपास १०० लोकांनी आपल्याला घेरलं आणि हिंदू कार्यक्रमात सहभागी होण्यावरुन आक्षेप नोंदवला अशी माहिती इशरत जहाँ यांनी दिली आहे.

“मोठा जमाव माझ्या घराबाहेर आला होता आणि तुम्ही हिजाब घालून हनुमान चालिसा कार्यक्रमात सहभागी का झालात अशी विचारणा करु लागला”, असं इशरत जहाँ यांनी सांगितलं आहे. यावेळी लोकांनी मला स्वत:हून घर सोडा अन्यथा आम्ही जबरदस्ती बाहेर काढू अशी धमकी दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. “मला जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. मी सुरक्षेची मागणी करते. मी माझ्या मुलासोबत एकटी राहते. माझ्यासोबत कधीही काहीही होऊ शकतं” अशी भीती इशरत जहाँ यांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी आपण याप्रकरणी तपास सुरु केला असून योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. “आपण एका धर्मनिरपेक्ष देशात राहत असून कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणे आपला घटनात्मक हक्क आहे”, असं इशरत जहाँ यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. “मी एक सुजाण नागरिक म्हणून माझं कर्तव्य पार पाडलं आहे. मी धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहे. मला माझ्या कुटुंबीयांकडूनही जीवे मारण्याची धमकी मिळत आहे”, असं इशरत जहाँ यांनी म्हटलं आहे.

तिहेरी तलाक प्रकऱणी न्यायालयात याचिका करणाऱ्या पाच महिलांपैकी एक इशरत जहाँ आहेत. २२ ऑगस्ट २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालायने तिहेरी तलाक पद्दत रद्द केली होती. पतीने दुबईतून फोनवरुन तलाक दिल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2019 3:44 pm

Web Title: bjp member ishrat jahan threatened for attending hanuman chalisa recital sgy 87
Next Stories
1 आसाम: पूरापासून बचावासाठी वन्यप्राण्यांची पळापळ, वाघाने घेतला स्थानिकांच्या घरात आश्रय
2 बॉर्डरवर तैनात असताना केला अभ्यास, पाचव्या प्रयत्नात बनला IAS अधिकारी
3 सुटकेनंतर मित्र आणि जेवणापासून दुरावल्याने व्याकुळ झाला, चोरी करुन पुन्हा तुरुंगात आला
Just Now!
X