News Flash

राहुल गांधींना कोणीच गांभीर्याने घेत नाही; भाजपाचा पलटवार

अनेक गोष्टींना राहुल गांधींचा विरोध, प्रसाद यांचा आरोप

केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. “राहुल गांधी यांचं तर त्यांचे मुख्यमंत्रीदेखील ऐकत नाहीत. याचा अर्थ असा की एकतर त्यांच्या वक्तव्यांमध्ये वजन नाही किंवा त्यांचे मुख्यमंत्री त्यांना गंभीरतेनं घेत नाहीत,” असं म्हणत रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांनी लॉकडाउनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यावर उत्तर देताना ते बोलत होते.

“सद्य परिस्थितीत आपण एकत्रित आहोत हे दाखवण्याची आहे. राजकारण हे नंतरही केलं जाऊ शकतं. राहुल गांधी लॉकडाउनचा विरोध केला. तसंच डॉक्टर्स, करोना वॉरिअर्सचा सन्मान करण्यासाठी थाळी आणि टाळ्या वाजवण्याचाही विरोध केला. देशात अनेकांनी दिवे लावण्याचा संकल्पही केला होता, त्यालाही त्यांनी विरोध केला,” असं प्रसाद म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी राहुल गांधींवर टीका केली.

आणखी वाचा- करोना संकटकाळात मोदी पंतप्रधान हे भारताचे सुदैव – राजनाथ सिंह

“राहुल गांधींचं तर त्यांचे मुख्यमंत्रीही ऐकत नाहीत. त्यांचं कोणी का ऐकत नाही हा प्रश्न आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सर्वात पहिले पंजाबमध्ये कर्फ्यू लावला, लॉकडाउनही जाहीर केला. राजस्थाननंदेखील हेच केलं. महाराष्ट्रातही हे झालं की नाही?” असा सवालही त्यांनी केला. “त्यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे हे पहिलेच सांगून टाकलं. सध्या देशाला एक संकल्प करून एकत्रितरित्या करोनाचा सामना करायचा आहे,” असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- “श्रमिक स्पेशल गाड्यांमध्ये मजुरांचा मृत्यू होणं ‘किरकोळ’ घटना”; भाजपा नेत्याच्या वक्तव्यावरुन नवा वाद

मजुरांच्या मदतीचे प्रयत्न

“सरकार प्रवासी मजुरांच्या मदतीचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यांना होणारा त्रास पाहून आम्हीदेखील दु:खी आहोत. मी बिहारमधून आहे. त्या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात प्रवासी मजुर परत गेले आहेत. त्यांच्यासाठी ३ हजार ५०० रेल्वेगाड्या, ३ महिन्यांचं भोजन, मजुरांना क्वारंटाइन करण्यासाठी तसंच स्क्रिनिंगसाठी मदत निधीतून ११ हजार कोटी रूपये, तसंच मनरेगामधून ४० हजार कोटी रूपये दिले गेले का नाही?,” असंही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 2:59 pm

Web Title: bjp minister ravishankar prasad criticize congress rahul gandhi cms also dont listen to him jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “करोनाला रोखण्यासाठी कायमचा लॉकडाउन ठेऊ शकत नाही”
2 वैमानिक करोना पॉझिटिव्ह, एअर इंडियाचे विमान उझबेकिस्तानवरुन बोलावले माघारी
3 दिल्ली करोनाच्या चार पावलं पुढे, अरविंद केजरीवालांचा दावा
Just Now!
X