26 November 2020

News Flash

कठुआ बलात्कार : भाजपा आमदाराची सीबीआय चौकशीची मागणी; घटनेच्या निषेधार्थ काढला मोर्चा

दबाव वाढू लागल्याने त्यांना जम्मू-काश्मीरच्या मंत्रीमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. या घटनेतील आरोपींचा ते बचाव करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

जम्मू-काश्मीरचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि माजी मंत्री चौधरी लाल सिंह यांनी कठुआ बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी मोर्चा काढला तसेच मोर्चाचे नेतृत्व करताना त्यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणीही केली.

जम्मू-काश्मीरचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि माजी मंत्री चौधरी लाल सिंह यांनी कठुआ बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी मोर्चा काढला तसेच मोर्चाचे नेतृत्व करताना त्यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणीही केली. आपल्या राजीनाम्यानंतर चौधरी यांनी सातत्याने सीबीआय चौकशीची मागणी लावून धरली आहे. ही चौकशी करायला मी सरकारला भागच पाडेन असेही त्यांनी म्हटले आहे.


कठुआ सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर दबाव वाढू लागल्याने चौधरी लाल सिंह यांना जम्मू-काश्मीरच्या मंत्रीमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. या घटनेतील आरोपींचा ते बचाव करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मात्र, त्यांनी आपल्यावरील या आरोपांचे खंडन केले होते. चौधरी हे जम्मू-काश्मीरच्या मंत्रीमंडळात वनमंत्री होते. गेल्या आठवड्यातही त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये एक विरोधी मोर्चा काढला होता.


चौधरी यांची ही प्रतिक्रिया जम्मू-काश्मीर मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर आली आहे. दरम्यान, भाजपाचे महासचिव राम माधव यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर मंत्रिमंडळाचा विस्तार कठुआ प्रकरणामुळे करण्यात आलेला नाही. तर, सरकारचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 3:31 pm

Web Title: bjp mla former jk minister choudhary lal singh leads a protest march demanding cbi inquiry in kathua case
Next Stories
1 जम्मू काश्मीरच्या मंत्रिमंडळात फेरबदल; काविंदर गुप्ता नवे उपमुख्यमंत्री
2 मला पुन्हा रांचीच्या रूग्णालयात जायचं नाहीये, लालूप्रसाद यांचं एम्सला पत्र
3 प्रेरणादायी: ब्रेन टयूमरशी लढा देत तिने मिळवला ‘ब्यूटी क्वीन’चा किताब
Just Now!
X