News Flash

बिहारमधील भाजपा आमदाराने घरीच घेतली करोनाची लस; सर्वस्तरातून जोरदार टीका

देशभरातील नागरिक पहाटेपासून लसीकरणासाठी रांगेत उभा राहिल्याचे दिसत आहेत.

संग्रहीत

देशात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. एकीकडे दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. तर दुसरीकडे लस उत्सव साजरा करण्याचे पंतप्रधान मोदींनी राज्यांना आवाहन केले आहे. लसीकरणासाठी नागरिक पहाटेपासून लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावून तासंतास उभा असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी लस तुटवड्यामुळे नागरिकांना लस देखील उपलब्ध होत नसल्याचे समोर येत आहे. मात्र असे असताना बिहारमधील भाजपा आमदाराने चक्क डॉक्टरांनाच घरी बोलावून स्वतःचे लसीकरण करून घेतल्याचे समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित भाजपा आमदरावर सर्वचस्तरातून जोरदार टीका होत आहे.

केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच लसीकरणाबाबतच्या नियमांचा भंग केल्याने, राजकीय वर्तुळातूनही भाजपावर जोरदार टीका होत आहे.

सामान्य जनता रांगेत आणि मंत्र्यांना मात्र घरपोच करोनाची लस? आरोग्य विभागाने घेतली दखल!

या आमदाराचे नाव अशोक सिंग ते मज्जफरपूरमधील पारू मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. असून त्यांनी स्वतःच्या लसीकरणासाठी रूग्णलाय किंवा लसीकरण केंद्रावर न जाता डॉक्टरांनाच स्वतःच्या घरी बोलावून घेतले होते. या प्रकारचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून, यामध्ये वैद्यकीय कर्मचारी या आमदारास त्याच्या घरीच लस देत असल्याचे दिसून येत आहे.

“…यात काय चूक आहे?”; घरात बसून सपत्नीक लस घेणाऱ्या कर्नाटकच्या मंत्रीमहोदयांचं म्हणण

या अगोदर मार्च महिन्यात कर्नाटकचे कृषीमंत्री बीसी पाटील यांनी देखील घरीच सपत्नीक लस घेतल्याचा प्रकार समोर आला होता. तेव्हा केंद्रीय आरोग्य विभागाने त्याबाबत दखल घेत, कर्नाटक सरकारकडून यासंदर्भातला अहवाल देखील मागवला होता. विशेष म्हणजे या मंत्रीमोहदयांनी स्वतःचे घरात लस घेतानाचे फोट सोशल मीडियावर शेअर करून नागरिकांना लसीकरणाचा प्रोटोकॉल पाळण्याचा सल्ला दिला होता.

आरोग्य विभागाने कर्नाटक सरकारला खुलासा मागितल्यावर मंत्रीमोहदयांनी याबाबतचा खुलासा केला होता. “जर मी लसीकरणासाठी रुग्णालयात गेलो, तर तेथील लोकांना मी तिथे भेट दिल्यामुळे थांबावे लागेल. परंतु, इथं मी लोकांना भेटू शकतो आणि लस देखील घेऊ शकतो, यात काय चूक आहे?” असं बीसी पाटील यांनी स्पष्टिकरण दिलं होतं

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 5:55 pm

Web Title: bjp mla from bihar gets corona vaccine at home strong criticism from all quarters msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “वो करे तो लीला… हम करे तो… जुर्म! वाह मोदीजी वाह..!!”
2 West Bengal Election : प्रचारबंदीविरोधात ममता बॅनर्जींचं धरणे आंदोलन! आंदोलनस्थळीच काढू लागल्या पेंटिंग!
3 West Bengal: निवडणूक आयोगाची भाजपा नेत्यावर मोठी कारवाई; प्रदेशाध्यक्षांनाही पाठवली नोटीस
Just Now!
X