31 October 2020

News Flash

एकाच दिवशी भाजपाने गमावले २ आमदार; एकाचा अपघाती तर दुसऱ्याचा आजाराने मृत्यू

अपघात इतका भीषण होता की त्यात २ सुरक्षारक्षक आणि ट्रक चालकाचाही मृत्यू झाला.

दिवंगत आमदार कल्याण सिंह, लोकेंद्र सिंह

भारतीय जनता पक्षासाठी वाईट बातमी आहे. पक्षाने एकाच दिवशी आपले दोन आमदारांना गमावले. राजस्थानच्या नाथद्वारा मतदारसंघाचे आमदार कल्याणसिंह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले तर दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील नूरपूरचे आमदार लोकेंद्र सिंह यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. ४१ वर्षीय लोकेंद्र यांची कार सीतापूर येथे एका ट्रकला धडकली. अपघात इतका भीषण होता की त्यात लोकेंद्र सिंह यांच्याबरोबर त्यांचे दोन सुरक्षारक्षक आणि ट्रक चालकाचाही जीव गेला.

राजस्थानमधील आमदार कल्याणसिंह प्रदीर्घ काळापासून आजारी होते. त्यांच्यावर उदयपूर येथील एका रूग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 12:39 pm

Web Title: bjp mla kalyan singh from rajasthan nathdwara passed away and lokendra singh bjp mla from bijnor noorpur died in a road accident
Next Stories
1 धक्कादायक ! गायीच्या पोटातून निघाले ८० किलो पॉलिथीन
2 इम्रान खान बाहेरख्यालीच, पूर्वाश्रमीच्या पत्नीचा आरोप
3 पक्षस्थापनेपूर्वी कलामांना कमल हसन यांचा सलाम
Just Now!
X