28 January 2021

News Flash

मुजफ्फरनगर दंगलीतील आरोपी भाजपा आमदाराला ऑस्ट्रेलियाने व्हिसा नाकारला

मुजफ्फरनगर येथील पंचायतीमध्ये संगीत सोम यांनी चिथावणीखोर भाषण दिल्याचा आरोप आहे.

BJP Mla sangeet som : ऑगस्ट २०१३ साली मुजफ्फरनगर येथे हिंदू आणि मुसलमान समाजामध्ये दंगल झाली होती. या दंगलीत ६२ जणांचा मृत्यू झाला होता तर ९३ जण जखमी झाले होते. याशिवाय, तब्बल ५० हजार लोकांना विस्थापित व्हावे लागले होते.

वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असणारे भाजपाचे उत्तर प्रदेशातील आमदार संगीत सोम यांना ऑस्ट्रेलियन सरकारकडून व्हिसा नाकारण्यात आला आहे. संगीत सोम यांनी स्वत:हून याबद्दलची माहिती दिली. मुजफ्फरनगर दंगलीत सहभाग असल्याच्या आरोपावरून आपल्याला व्हिसा नाकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मला मुजफ्फरनगरविषयी खूप प्रेम आहे. मात्र, आता त्यामुळेच मला कोणताही देश व्हिसा द्यायला तयार नाही. मी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, माझ्यावर सुरू असलेल्या खटल्यांचे कारण देत ऑस्ट्रेलियन सरकारने मला व्हिसा नाकारला. त्यामुळे मी ऑस्ट्रेलियाला जाण्याचा विचार सोडून दिला, असे सोम यांनी सांगितले. संगीत सोम यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी उमेदवारी अर्ज भरताना आपल्याविरुद्ध न्यायालयात पाच खटले सुरु असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद केली होती. मात्र, यापैकी एकाही प्रकरणात मला दोषी ठरवण्यात आले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘गद्दारांनी उभारलेला ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील कलंक’ 

मुजफ्फरनगर दंगलीपूर्वी संगीत सोम ऑस्ट्रेलिया, सिंगापूर येथे जाऊन आले आहेत. तेव्हा त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय व्हिसा मिळाला होता. मात्र, मुजफ्फरनगरच्या दंगलीनंतर त्यांना व्हिसाविषयक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑगस्ट २०१३ साली मुजफ्फरनगर येथे हिंदू आणि मुसलमान समाजामध्ये दंगल झाली होती. या दंगलीत ६२ जणांचा मृत्यू झाला होता तर ९३ जण जखमी झाले होते. याशिवाय, तब्बल ५० हजार लोकांना विस्थापित व्हावे लागले होते. डिसेंबर २०१३ मध्ये मुजफ्फरनगर येथील पंचायतीमध्ये संगीत सोम यांनी चिथावणीखोर भाषण दिल्याचा आरोप आहे. त्यावेळी सरकारने त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातंर्गत कारवाई केली होती. मात्र, न्यायालयाने संगीत सोम यांना निर्दोष मुक्त केले होते.

‘गद्दारांनी बांधलेल्या लाल किल्ल्यावरुन झेंडावंदन करणे मोदी बंद करणार का?’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2018 3:27 pm

Web Title: bjp mla sangeet som denied visa by australia due to muzaffarnagar riot
Next Stories
1 पक्षनिधीसाठी भाजपाचे आमदारांना ‘टार्गेट’
2 ‘टेरर फंडिंग’प्रकरणी आरोपपत्र दाखल; हाफिज सईदच्या नावाचाही समावेश
3 संजय जोशींप्रमाणे माझ्याही बनावट सीडींचे वाटप सुरू, तोगडियांचा नवा आरोप
Just Now!
X