News Flash

भाजपाचे वादग्रस्त आमदार संगीत सोम यांच्या घरावर ग्रेनेड हल्ला, अंदाधुंद गोळीबार

दोन वर्षांपूर्वी माझ्या घरावर ग्रेनेड हल्ला करु, अशी धमकी देण्यात आली होती, असे संगीत सोम यांनी सांगितले.

भाजपाचे वादग्रस्त आमदार संगीत सोम यांच्या घरावर ग्रेनेड हल्ला, अंदाधुंद गोळीबार
आमदार सोम यांनी आपल्याला कोणत्याही प्रकारचा धमकीचा फोन आला नसल्याचे माध्यमांना सांगितले. दोन वर्षांपूर्वी माझ्या घरावर ग्रेनेड हल्ला करु अशी धमकी देण्यात आली होती, असे ते म्हणाले. (छायाचित्र: एएनआय)

भाजपाचे वादग्रस्त आमदार संगीत सोम यांच्या उत्तर प्रदेशमधील मीरत येथील घरावर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. घरावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. तसेच हँड ग्रेनेडही फेकण्यात आले. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आमदार सोम हे सुरक्षित आहेत. जो ग्रेनेड फेकण्यात आला होता. त्याचा स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, आमदार सोम यांनी आपल्याला कोणत्याही प्रकारचा धमकीचा फोन आला नसल्याचे माध्यमांना सांगितले. पण दोन वर्षांपूर्वी माझ्या घरावर ग्रेनेड हल्ला करु अशी धमकी देण्यात आली होती, असेही ते म्हणाले. संगीत सोम अनेकवेळा आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात येते.

हल्ल्याचे वृत्त समजताच घटनास्थळी मीरतच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली. ही घटना १२.४५ च्या सुमारास घडली अशी माहिती सुरक्षा रक्षकाने दिल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. घटनास्थळी रिकामी काडतुसे आणि भिंतीवर गोळीबाराचे निशाण आढळून आले असून फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरु आहे. एक हँड ग्रेनेडही जप्त करण्यात आले आहे. या हल्ल्यात कोणाला इजा झालेली नाही. सुरक्षा रक्षकाची केबिन आणि मुख्य दरवाजावर गोळीबार करण्यात आला होता, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2018 9:50 am

Web Title: bjp mla sangeet som residence attacked by unidentified miscreants
Next Stories
1 आधार वैध, पण सक्ती अवैध
2 पंतप्रधान मोदींना कॉल ड्रॉपची समस्या, दूरसंचार विभागाला तोडगा काढण्याची सूचना
3 पंतप्रधान नरेंद्र मोदींना संयुक्त राष्ट्रसंघाचा मानाचा पुरस्कार
Just Now!
X