News Flash

‘या’ भाजपा नेत्याने त्यांच्याच सरकारवर केला २१,४७३ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारे भाजपाचे एएच विश्वनाथ यांनी त्यांच्याच सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप लावला आहे.

विधान परिषद सदस्य एएच विश्वनाथ (photo indian express)

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारे भाजपाचे एएच विश्वनाथ यांनी त्यांच्याच सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप लावला आहे. पाटबंधारे विभागाने आर्थिक मंजुरी न घेता घाईत २१,४७३ कोटी रुपयांचा निविदा काढल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच यामध्ये घोटाळा झाला असल्याचा देखील विश्वनाथ म्हणाले. एएच विश्वनाथ हे विधान परिषद सदस्य आहेत.

विश्वनाथ यांनी येडियुरप्पा यांचा मुलगा आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी वाय. विजयेंद्र यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. विश्वनाथ पत्रकार परिषदेत म्हणाले, “भद्रा अप्पर कालवा प्रकल्प व कावेरी पाटबंधारे प्रकल्पांशी संबंधित पाटबंधारे विभागात २० हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे कंत्राट तयार केले गेले आहे. वित्त विभागाकडून कोणतीही आर्थिक मंजुरी घेण्यात आली नाही, मंडळाची बैठक घेण्यात आली नाही. हे घाईघाईने केले गेले.”

हेही वाचा- अमित शाहांना भाजपा प्रदेशाध्यक्षांनी चुकीची माहिती दिली; सोवन चॅटर्जी यांचा दावा

“ठेकेदाराकडून लाच घेण्याच्या उद्देश्शाने हे केले गेले. कंत्राटदारांच्या हिताचा विचार करणारे हे सरकार आहे का?”, असा प्रश्न एएच विश्वनाथ यांनी यावेळी उपस्थित केला. विश्वनाथ हे विधान परिषद सदस्य आहेत. त्यांनी दोन वर्षांपूर्वी जनता दलातून भाजपात प्रवेश केला. सरकारच्या मंत्र्यांसह संपूर्ण राज्य विजयेंद्र यांच्या प्रशासनात हस्तक्षेपाबद्दल बोलत असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

प्रत्येक विभागात विजयेंद्र यांचा हस्तक्षेप

विश्वनाथ म्हणाले, “आज कोणता मंत्री समाधानी आहे? प्रत्येक विभागात विजयेंद्र यांचा हस्तक्षेप आहे.” विश्वनाथ यांचे हे वक्तव्य अशावेळी आले ज्यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कर्नाटकचे प्रभारी अरुण सिंह तीन दिवसांच्या राज्य दौर्‍यावर आहेत. येडियुरप्पा यांना हटविण्याच्या मागणीच्या काही आमदारांच्या पार्श्वभूमीवर सिंग हे कर्नाटकात आमदारांशी चर्चा करण्यासाठी गेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 5:21 pm

Web Title: bjp mlc vishwanath alleges rs 21473 crore tender scam srk 94
Next Stories
1 ममता बॅनर्जींना नंदीग्राममधूनच निवडून यायचंय, पराभव अमान्य; प्रकरण न्यायालयात!
2 “क्योंकि बहू भी कभी टेनिस फैन थी…”; टेनिसचा व्हायरल व्हिडीओ शेअर करत स्मृती इराणींचा फ्री हीट
3 “केजरीवालांसोबत जाणं ही मोठी चूक” म्हणत पंजाब ‘आप’ झाली काँग्रेसमध्ये विलीन
Just Now!
X