News Flash

पश्चिम बंगाल : भाजपा खासदार अर्जुन सिहं यांच्या गाडीवर हल्ला, टीएमसी कार्यकर्त्यांवर आरोप

पोलिसांच्या लाठीमारात गंभीर दुखापत झाल्याचीही दिली माहिती

पश्चिम बंगालमधील भाजपाचे खासदार अर्जुन सिंह यांच्या गाडीवर रविवारी हल्ला झाला. ज्यामध्ये त्यांच्या गाडीची मोठ्याप्रमाणात थोडफोड करण्यात आली. तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. टीएमसीचे कार्यकर्ते भाजपा कार्यालयचा ताबा घेऊ इच्छित होते, असेही अर्जुन सिंह यांनी म्हटले आहे.

खासदार अर्जुन सिंह यांनी म्हटले आहे की, माझ्यावर हल्ला करण्यात आला आणि माझ्या गाडीची तोडफोड करण्यात आली. या घटनेचा लोक शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवत होते. मात्र पोलिस आयुक्त मनोज वर्मा यांनी माझ्या डोक्यावर लाठीमार केला व माझ्याशी असभ्य भाषा वापरत वर्तवणूक केली. शिवाय माझ्या घरावरही हल्ला केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

ही घटना पश्चिम बंगालच्या नॉर्थ २४ परगना येथील आहे. भाजपा खासदार अर्जुन सिंह श्यामनगर येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी गेले होते. यादरम्यान टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा वाहनाची थोडफोड केली असल्याचे सांगण्यात आले आहे.

अर्जुन सिंह हे पश्चिम बंगालमधील बैरकपूर मतदारसंघाचे भाजपाचे खासदार आहेत. त्यांच्यावर टीएमसी कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला असल्याचा भाजपाकडूनही आरोप करण्यात आलेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 5:01 pm

Web Title: bjp mp arjun singhs car attacked msr 87
Next Stories
1 राहुल गांधींच्या वक्तव्याचा पाकिस्तानकडून वापर, ही काँग्रेससाठी शरमेची बाब – गृहमंत्री अमित शाह
2 भाजपा, बजरंग दल आयएसआयकडून पैसे घेतात – दिग्विजय सिंह
3 मोदी सरकारच्या चुकांमुळेच अर्थव्यवस्था डबघाईला; माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची टीका
Just Now!
X