भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार अशोक गस्ती यांचं करोनामुळे निधन झालं आहे. ५५ वर्षीय अशोक गस्ती यांची प्रकृती बिघडल्याने मनिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाचे संचालक डॉक्टर मनिष राय यांनी गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास अशोक गस्ती यांचं निधन झालं असल्याची माहिती दिली. दरम्यान भाजपा नेत्यांच्या ट्विटमुळे अशोक गस्ती यांच्या निधनावरुन काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता.

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, “अशोक गस्ती यांना करोनाची लागण झाली होती. अनेक अवयव निकामी झाले होते. त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं”.

utkarsha rupwate, Shirdi, vanchit,
नाराज उत्कर्षा रुपवते यांचा काँग्रेसचा राजीनामा, वंचितमध्ये प्रवेश; शिर्डीतून लढणार
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत
rohit pawar, supriya sule, baramati lok sabha
अजित पवारांनी केलेल्या सर्वेक्षणात सुप्रिया सुळे आघाडीवर; रोहित पवार म्हणाले, “सुप्रिया सुळे अडीच लाख मतांनी…”

अशोक गस्ती उत्तर कर्नाटकातील रायचूर येथील होते. त्यांनी बूथ वर्करपासून आपल्या कामाला सुरुवात केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अशोक गस्ती यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून त्यांचा समर्पित कार्यकर्ता असा उल्लेख केला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ट्विट करत अशोक गस्ती यांना श्रद्धांजली वाहिली.

 

जून महिन्यात अशोक गस्ती यांची बिनविरोध निवड झाली होती. पण करोनामुळे अशोक गस्ती संसदेत उपस्थित राहू शकले नव्हते. अशोक गस्ती पहिल्यांदाच राज्यसभेवर निवडून गेले होते. उमेदवारी मिलळाल्यानंतर एका बूथ वर्करला इतकी मोठी संधी दिल्याबद्दल आभार मानताना हा आपल्याासठी खूप आनंदाचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली होती.