28 September 2020

News Flash

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना करोनाची लागण

यापूर्वीही काही केंद्रीय मंत्र्यांना झाली होती करोनाची लागण

देशात करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. असातच गेल्या काही दिवसांमध्ये देशातील काही नेत्यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. आता आणखी एका केंद्रीय मंत्र्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली.

“मी करोनाची चाचणी केली आणि त्या चाचणीचे निकाल पॉझिटिव्ह आले आहेत. मी आता होम आयसोलेशनमध्ये आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना चाचणी करावी आणि आवश्यक ती काळजी घ्यावी,” असं श्रीपाद नाईक म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

श्रीपाद नाईक यांच्यापूर्वी केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनादेखील करोनाची लागण झाली होती. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील आपल्याला करोनाची लागण झाल्याचं सांगितलं होतं. याव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांनादेखील करोनाची लागण झाली होती. देशात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत देशात २३ लाखांपेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण धआली आहे. तर दुसरीकडे करोनामुळे ४६ हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १६ लाख रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2020 7:59 pm

Web Title: bjp mp ayush minister goa shripad naik tested coronavirus positive home isolation informed on twitter jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 राहुल गांधीच म्हणाले; “मोदी है तो मुमकिन है”
2 सुशांत सिंह मृत्यू प्रकरण : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात पाटण्यात तक्रार दाखल
3 माजिद मेमन यांचं सुशांतबाबचं ‘ते’ वक्तव्य वैयक्तिक; राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण
Just Now!
X