माजी केंद्रीय मंत्री आणि अजमेरचे भाजप खासदार सांवरलाल जाट यांचं दिल्लीत निधन झालं. गेल्या महिन्यात (२२ जुलै) राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यक्रमात सांवरलाल जाट बेशुद्ध पडले होते. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांवरलाल जाट हे अजमेर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. मोदी सरकारमध्ये ते जलसंपदा राज्यमंत्री होते. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ पर्यंत ते केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्रिपदी होते. जाट यांचा जन्म १९५५ मध्ये राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील गोपालपुरा गावी झाला होता. १९९३, २००३ आणि २०१३ मध्ये त्यांनी राजस्थान सरकारमध्ये मंत्रीपद भूषवले होते. २०१४ मध्ये अजमेर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रीपद देण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp from ajmer and former union minister sanwar lal jat passes away delhi
First published on: 09-08-2017 at 09:25 IST