News Flash

..तर दिल्लीवासियांनी ‘आप’ले ही आभार मानले असते ! गंभीरचा केजरीवालांना टोला

केजरीवाल २१ व्या शतकातील तुघलक - गंभीर

एकीकडे संपूर्ण देश करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत असताना देशातील काही राज्यांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागतो आहे. आसाम राज्याला पुराचा विळखा पडलेला असून राजधानी दिल्लीतही गेल्या काही दिवसांत पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळे दिल्लीच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं पहायला मिळालं. भारतीय जनता पार्टीचा दिल्लीचा खासदार गौतम गंभीरने या परिस्थितीवरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला टोला लगावला आहे.

दिल्ली वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आझादपूर अंडरपास, साऊथ एव्हेन्यू रोड, प्रल्हादपूर अंडरपास, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन यासारख्या भागांमध्ये पाणी साचलं होतं. लंडन-पॅरिस सारख्या रस्त्यांसाठी दिल्ली सरकारने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबवलाय असं ऐकायला मिळालं, याची जाहीरात कधी पहायला मिळेल मुख्यमंत्री जी?? अशा मार्मिक शब्दांत दिल्लीतील सद्य परिस्थितीचे फोटो टाकत गंभीरने केजरीवालांवर निशाणा साधला आहे.

जाहीरातींचा अपवाद वगळता दिल्ली सरकारच्या अखत्यारीत नेमकं काय काय येतं हे आम्हाला सांगा. केंद्र आणि दिल्ली पालिकेला दोष देत ६ वर्ष उलटली. जेवढा पैसा हॅशटॅग आणि जाहिरातींवर खर्च केला जातोय, तोच पैसा दिल्लीसाठी खर्च केला असता तर दिल्लीवासियांनी तुमचेही आभार मानले असते अशी टीका गंभीरने केली आहे.

गौतम गंभीर पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आला आहे. जाहिरातींवर पैसा खर्च करणाऱ्या अरविंद केजरीवालांना गौतम गंभीरने आपल्या ट्विटमध्ये २१ व्या शतकातील तुघलक अशी उपमा दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलं आहे. सेंट्रल दिल्ली परिसरात एका ट्रकचालकाला या परिस्तितीमुळे आपले प्राण गमवावे लागले. यानंतर आम आदमी पक्षातील काही नेत्यांनीही दिल्ली सरकारच्या कार्यपद्धतीवर टिका केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 4:34 pm

Web Title: bjp mp gautam gambhir attack delhi cm arvind kejriwal over waterlogged roads in state psd 91
Next Stories
1 करोना विषाणूंशी लढण्याची काही लोकांमध्ये उपजत प्रतिकारशक्ती; अभ्यासातील निष्कर्ष
2 …हा भ्रम लवकरच तुटेल आणि देशाला याची जबर किंमत मोजावी लागेल; राहुल गांधींचा इशारा
3 ‘ते’ आमदार गेहलोत यांच्याविरोधात जाऊ शकतात; भाजपाच्या मित्रपक्षाचा दावा
Just Now!
X