News Flash

भाजपा खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी

आंतरराष्ट्रीय क्रमांकावर फोन करून त्यांना ही धमकी देण्यात आली.

दिल्लीचा खासदार गौतम गंभीरने सर्वात प्रथम दिल्लीतील रुग्णालयांसाठी आपल्या खासदार निधीतून ५० लाखांचा निधी दिला. यानंतर आपला महिन्याचा पगार पंतप्रधान सहायनिधीला देत, खासदार फंडातून १ कोटी रुपयेही दिले.

भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फोनवरून त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारी गौतम गंभीर यांनी दिल्ली पोलिसांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आणि एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

दोन दिवसांपूर्वी आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचं गौतम गंभीर यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं असल्याची माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावर फोन करून त्यांना ही धमकी देण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसंच आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावं, अशी मागणीही त्यांनी कली आहे. पोलिसांनीही या घटनेची गंभीर देखल घेतली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये गौतम गंभीर हे दिल्ली (पूर्व) येथून निवडून आले होते. काँग्रेसने या ठिकाणाहून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंद सिंह लवली यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. तर आम आदमी पक्षानं आतिशी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. गंभीर यांनी लवली यांचा ३.९३ लाखांच्या फरकानं पराभव केला होता. तर आतीशी यांना केवळ २ लाख मतं मिळाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 3:25 pm

Web Title: bjp mp gautam gambhir threatens to kill him jud 87
Next Stories
1 आमचा प्रधानसेवक मुका आणि बहिरा : अनुराग कश्यप
2 ‘ऑपरेशन डॉल्फिन नोज’, पाणबुडयांच्या लोकेशन्सची ISI ला माहिती देणाऱ्या सात नौसैनिकांना अटक
3 शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन पाकिस्तानी सैनिक ठार
Just Now!
X