04 December 2020

News Flash

हेमा मालिनी म्हणतात एका मिनिटात मुख्यमंत्री बनेन पण….

मुख्यमंत्री बनणे माझ्यासाठी फारसे कठिण नाही. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी मुख्यमंत्री बनू शकते पण मुख्यमंत्रीपदामध्ये मला फारसा रस नाही असे भाजपा खासदार हेमा

हेमा मालिनी

मुख्यमंत्री बनणे माझ्यासाठी फारसे कठिण नाही. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी मुख्यमंत्री बनू शकते पण मुख्यमंत्रीपदामध्ये मला फारसा रस नाही असे प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री पदाबाबत मी फारशी गंभीर नाही. माझी इच्छा झाली तर मी एका मिनिटात मुख्यमंत्री बनू शकते. पण मला स्वत:ला बांधून घेण्याची इच्छा नाही. मुख्यमंत्री बनताच माझे स्वातंत्र्य संपुष्टात येईल असे हेमा मालिनी यांनी म्हटले आहे.

राजस्थान बंसवाडा येथे त्या पत्रकारांशी बोलत होत्या. आज मी माझ्या फिल्मी करीअरमुळे खासदार आहे. बॉलिवूडमध्ये माझे जे नाव आहे त्यामुळे लोक मला ओळखतात असे हेमा मालिनी म्हणाल्या. मथुरेच्या खासदार म्हणून आपल्या कामाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या कि, मागच्या चार वर्षात मी माझ्या मतदारसंघात भरपूर काम केले आहे. ब्रिजवासी जनतेच्या विकासासाठी काम करताना एक आनंद, समाधान मिळते असे त्यांनी सांगितले.

हेमा मालिनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले. नरेंद्र मोदींनी शेतकरी, महिला आणि गरीबांसाठी भरपूर काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती सुरु आहे. त्यांच्यासारखा पंतप्रधान मिळणे कठिण आहे. विरोधी पक्षातील लोक काही बोलतील पण देशासाठी कोणी जास्त काम केलेय ते आपण पाहिले पाहिजे असे हेमा मालिनी म्हणाल्या. भरतनाटयम नृत्यात पारंगत असणाऱ्या हेमा मालिनी धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बंसवाडा येथे आल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 7:35 pm

Web Title: bjp mp hema malini said she can become cm any time
टॅग Bollywood
Next Stories
1 FB बुलेटीन: मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट आणि अन्य बातम्या
2 इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत आता ३१ जुलै ऐवजी ३१ ऑगस्ट
3 चीन-अमेरिकेबरोबरच्या संबंधांवर इम्रान खान म्हणतात…
Just Now!
X