News Flash

‘मोदींच्या दहशतीने भाजप खासदार गप्प’

मोदींनी विश्वसार्हता गमाविल्याचा आरोपही त्यांनी केला.

चंद्रकांत खैरे (संग्रहित छायाचित्र)

शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांचा दावा; नाराजी उघड करण्याची भीती वाटत असल्याचे मत

नोटाबंदीवरून भाजप खासदारांमध्येही अस्वस्थता आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतीमुळे ते बोलू शकत नाही. आपल्याला बाजूला ढकलण्याची भीती त्यांना वाटत आहे, असा दावा शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी केला. मोदींनी विश्वसार्हता गमाविल्याचा आरोपही त्यांनी केला.

नोटाबंदीवरून शिवसेनेने मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या पाष्टद्धr(२२८र्)भूमीवर ते म्हणाले, स्विस बँकेकडून काळा पैसा परत आणण्याचे आश्वसन मोदींनी दिले होते. मात्र, त्यांनी स्वित्झर्लंड सरकारने थारा दिला नाही. त्यामुळे मोदींनी आता सामान्य भारतीयांना दाढेखाली धरले आहे. स्वत:च्या पैशांसाठी जनता त्रस्त झाली आहे. त्यातच प्राप्तीकर खात्याकडून कारवाईचे इशारे दिले जात आहेत. शिवसेना काळा पैशांविरोधात नाही; पण जनतेला त्रास देण्यास कायम विरोध करेल.

नोटाबंदीचा निर्णय गोपनीय असल्याचा दावा खैरेंनी फेटाळला. ‘कसली गोपनीयता? गुजराती वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी अगोदरच प्रसिद्ध झाली होती. भाजप कार्यकर्त्यांंनी अगोदरच नोटा बदलल्या. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्‍‌र्हनर डॉ. उर्जित पटेल हे अगोदर रिलायन्स उद्य्ोगसमूहात होते. त्यांनी कशावरून मुकेश अंबानी यांना नोटाबंदीची पूर्वकल्पना दिली नसेल? या सगळ्या घटनेने मोदींची विश्वसार्हता संपली आहे,’ असे ते म्हणाले.

‘लोकसभेत स्थगन प्रस्तावावरील मतदानास भाजपसोडून सगळे तयार आहेत. सरकारकडे मजबूत संख्याबळ असताना मतदानाला सरकार का घाबरतेय?,’ असाही सवाल त्यांनी केला. मतदान झाल्यास शिवसेना विरोधात मतदान करणार का?, यावर ते स्पष्ट उत्तर न देता ते म्हणाले, ‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार निर्णय घेऊ.’

‘पैसे नसल्याने दिवसभर उपाशी..’

नोटाबंदीचा फटका आपल्यालाही बसला असून पैशांअभावी सोमवारी दिवसभर जेवलो नसल्याचा दावा खैरे यांनी केला. ‘माझा स्वयंपाकी दोन हजार रूपये काढण्यासाठी दिवसभर बँकेच्या रांगेत होता. तो सायंकाळी परतला. त्यामुळे दिवसभर उपाशी आहे. माझ्यासारख्या खासदाराची स्थिती अशी असेल तर सामान्यांची स्थितीची कल्पना केलेली बरी..,’ असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, खैरे यांचे निवासस्थान महाराष्ट्रातून आलेल्या मराठी मंडळींनी कायम गजबजलेले असते. कामांसाठी राजधानीत येणारया सामान्यांची काळजी घेण्याबद्दल त्यांचा नावलौकिक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 1:10 am

Web Title: bjp mp quit due to narendra modi dismay says shiv sena mp chandrakant khaire
Next Stories
1 सव्वा लाख रिक्त पदे रेल्वे अपघातांच्या मुळाशी
2 मुलायमसिंह यांच्या नकारानंतर उत्तर प्रदेशात आरएलडी-जद(यू)-बीएस-४ आघाडी
3 २००० रुपयांच्या नोटा जारी करण्याचा निर्णय बेकायदेशीर, काँग्रेसचा आरोप
Just Now!
X