News Flash

भाजपा खासदार शर्मा यांची दिल्लीत गळफास घेऊन आत्महत्या

दिल्लीतील खासदार निवासात संपवलं जीवन

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (छायाचित्र।एएनआय)

काँग्रेसचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या घटनेला काही दिवस लोटत नाही, तोच आणखी एका खासदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. भाजपाचे खासदार राम स्वरूप शर्मा यांनी दिल्लीतील खासदार निवासात गळफास घेऊन जीवन संपवलं. त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. कर्मचाऱ्यांने पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही घटना समोर आली. आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

राम स्वरूप शर्मा हे भाजपाचे खासदार असून, ते हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते. दिल्लीतील आरएलएम रुग्णालयाजवळ खासदारांचं निवासस्थान आहे. याच खासदार निवासात ६२ वर्षीय शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

शर्मा यांच्या निवासस्थानातील कर्मचाऱ्यांने दिल्ली पोलिसांना ८.३० वाजता याची फोन करून माहिती दिली. शर्मा यांनी आत्महत्या केल्याचं कर्मचाऱ्याने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी शर्मा यांचा मृतदेह लटकेल्या अवस्थेत आढळून आला. शर्मा यांनी आत्महत्या का केली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

“शर्मा यांच्या रुमचा दरवाजा उघडण्यास गेलो, तेव्हा दरवाजा आतून बंद करण्यात आल्याचं कळलं. त्यानंतर मी आवाज दिले. वारंवार आवाज देऊनही आतून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. त्यानंतर पोलिसांना फोन केला. पोलीस आले आणि त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी खोलीत शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला,” अशी माहिती शर्मा यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने पोलिसांना दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 10:09 am

Web Title: bjp mp ram swaroop sharma died allegedly by suicide in delhi bmh 90
Next Stories
1 धक्कादायक CCTV! मुलाने कानशिलात लगावली…आईने जागेवरच सोडला प्राण
2 दोन मसाज पार्लरमध्ये अंदाधूंद गोळीबार; आठ जणांचा मृत्यू
3 महाविकास आघाडी सरकार भक्कम!
Just Now!
X