News Flash

“२०२४ साली पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल?”; भाजपा खासदाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न

भाजपा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सुब्रह्मण्यम स्वामी सरकारची कानउघाडणी करत आहेत.

भाजपा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी (Photo- Indian Express)

भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सुब्रमण्यम स्वामी सरकारची कानउघाडणी करत आहेत. चीनची घुसखोरी, करोना, राम मंदिर या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. त्यांच्या या टीकेनंतर विरोधकांच्या हाती आयता मुद्दा मिळाला आहे. तर २०२४ साली पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे.

“चीननं देशात घुसखोरी केल्यानंतर आपल्याला त्यांना सडेतोड उत्तर देणं गरजेचं होतं. गलवान, कैलाश रेंजमध्ये आपण करुन दाखवलं. मात्र पुन्हा एकदा चर्चेकडे वळलो. हे चर्चेचं गुऱ्हाळ मला समजत नाही. आपली जमीन आहे, आपल्या छातीवर बसले आहेत. त्यांच्य़ाशी चर्चा काय करायची. आपल्याला त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. चीनसोबत युद्ध करणं गरजेचं आहे. चीन जगासमोर आपल्याला दाबत असल्याचं दाखवत आहे. त्यात त्यांना यश मिळताना दिसत आहे.”, अशा शब्दात सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला खडसावलं.”नरेंद्र मोदी स्वत: सांगतात, ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांनी कोणत्याही पदावर राहू नये. वयोमानामुळे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि शांताकुमार यांना बाजूला सारलं आहे. आता २०२४ मध्ये भाजपाचा चेहरा कोण असेल?, याबाबत त्यांनी खुलासा केला पाहीजे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला पाहीजे. कार्यकर्त्यांना विचारलं नाही, तर वाजपेयींसारखी परिस्थिती होईल”, असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितलं. त्याचबरोबर २०२४ मध्ये भाजपाचंच सरकार येईल, हे देखील सांगायला ते विसरले नाही. असं त्यांनी ईटीव्ही भारताला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

“दोन आठवडे झालेत, अदानींच्या कंपन्यांत कुणी पैसे गुंतवलेत अजून कळेना”

जम्मू काश्मीरमधील नेत्यांची बैठकीही अमेरिकेच्या दबावात बोलवण्यात आल्याची टीका त्यांनी केली. तसेच करोनास्थितीवरुनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. पहिल्या लाटेनंतर वाढलेल्या अहंकारामुळे दुसऱ्या लाटेत देशाचं नुकसान झालं. आता तिसरी लाट येणार असल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. “देशात आणीबाणीसारखी स्थिती नाही. आम्ही मुक्तपणे फिरू शकतो. आम्हाला कुणीही तुरुंगात टाकत नाही. त्यावेळेस आम्हाला कोणताच अधिकार नव्हता. मी भाजपामध्ये आहे, मला कोणती गोष्ट आवडली नाही, तर मी टीका करु शकतो. मात्र काँग्रेसमध्ये आजही कुणी असं करु शकत नाही. आजची स्थिती आणीबाणीशी जोडणं चुकीचं ठरेल”, असं सांगत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं.राम मंदिराच्या शिलान्यासासाठी आमंत्रित न केल्याने त्यांनी नाराजीही व्यक्त केली. राममंदिर खटला जिंकवण्यात मोलाचा सहभाग होता, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 8:56 pm

Web Title: bjp mp subramanian swamy allegation on modi and central government rmt 84
टॅग : Bjp
Next Stories
1 हाँगकाँगमध्ये बंदरात उभ्या असलेल्या १६ जहाजांना भीषण आग; १० जहाजं बुडाली
2 मटण नाही, तर लग्न नाही! संतापलेल्या नवरदेवाने दुसऱ्याचं मुलीशी थाटला संसार
3 ‘एमआयएम’ उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत १०० जागा लढवणार!
Just Now!
X