News Flash

“जर मला मोदींकडून प्रतिसाद मिळाला नाही तर…,” सुब्रमण्यम स्वामींनी दिला इशारा

सुब्रमण्यम स्वामींचा आक्रमक पवित्रा

भाजपा नेते सुब्रहमण्यम स्वामी नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांनी जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली असून त्यांच्याविरोधात वक्तव्यं केली आहेत. दरम्यान सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे. सुशांत प्रकरणी आपण केलेल्या मागणीला प्रतिसाद मिळाला नाही तर जनहित याचिका दाखल करु असं ते म्हणाले आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केलं आहे.

ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “सुशांत सिंहच्या शवविच्छेदनावरुन डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या समितीने काढलेल्या निष्कर्षांची पुन्हा तपासणी करण्याची गरज असल्याच्या मागणीवर जर पंतप्रधानांनी उत्तर दिलं नाही तर माझ्याकडे जनहित याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे. कलम १९ आणि २१ अंतर्गत लवकर न्याय मिळण्यासाठी आणि सुशांतचा मृत्यू कसा झाला हे जाणून घेण्याचा मला अधिकार आहे”.

सुशांत प्रकरणी एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे.

एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.

सुशांत सिंहचा १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात मृतदेह आढळला होता. सुशांतने आत्महत्या केली असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं असलं तरी ही हत्या असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआय याप्रकरणी तपास करत असून आपण सर्व बाजूंची पडताळणी करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 4:22 pm

Web Title: bjp mp subramanian swamy sushant singh death pm narendra modi sgy 87
Next Stories
1 महागाई, काळे कायदे.. जनतेवर हे वार करुन मोदी सरकार शांत-राहुल गांधी
2 “मी वडिलांची हत्या केली आहे, अटक करण्यासाठी या,” मुलीच्या फोनने पोलीसही चक्रावले
3 बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X