News Flash

उसदरवाढीसाठी वरुण गांधी यांचे योगींना पत्र

केंद्र सरकारने आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करावी असे आवाहन उत्तर प्रदेशातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेलेले वरुण गांधी यांनी यापूर्वी केले आहे.

उसदरवाढीसाठी वरुण गांधी यांचे योगींना पत्र

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना उसाचा दर वाढवून द्यावा, गहू व धान या पिकांसाठी बोनस द्यावा, पीएम किसान योजनेत मिळणारी रक्कम दुप्पट करावी आणि डिझेलवर अनुदान द्यावे, यासह इतर मागण्या करणारे पत्र भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवले आहे.

केंद्र सरकारने आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करावी असे आवाहन उत्तर प्रदेशातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेलेले वरुण गांधी यांनी यापूर्वी केले आहे.

पिलिभितचे खासदार असलेले वरुण यांनी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या दोन पानी पत्रात शेतकऱ्यांच्या समस्या व मागण्या नमूद केल्या असून उपाययोजनाही सुचवल्या आहेत. उत्तर प्रदेशात सध्या उसाचा विक्री दर क्विंटलमागे ३१५ रुपये आहे, तो वाढवून ४०० रुपये करावा, अशी सूचना गांधी यांनी केली आहे. उसाचे  पीक प्रामुख्याने पश्चिम उत्तर प्रदेशात घेतले जाते. हा भाग सध्या केंद्राच्या शेती कायद्याविरुद्ध राज्यात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे केंद्र बनला आहे. गहू, धानाच्या किमान हमीभावाव्यतिरिक्त  क्विंटलमागे २०० रुपयांचा  बोनस द्यावा, असेही वरुण यांनी म्हटले आहे.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (पीएम-किसान) योजनेत सध्या शेतकऱ्यांना दिली जाणारी वार्षिक ६ हजार रुपयांची रक्कम १२ हजार, म्हणजे दुप्पट केली जावी आणि जादा ६ हजार रुपये राज्य सरकारने स्वत:च्या खजिन्यातून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. वीज आणि डिझेल यांच्या दरांबाबत शेतकऱ्यांच्या चिंतेशी सहमती व्यक्त करताना, डिझेलवर लिटरमागे २० रुपयांचे अनुदान द्यावे आणि विजेचे दर तत्काळ कमी करावे, अशी विनंती वरुण यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2021 1:13 am

Web Title: bjp mp varun gandhi chief minister yogi adityanath discussion with agitating farmers akp 94
Next Stories
1 काश्मीरमध्ये पोलीस अधिकारी शहीद
2 उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट
3 पाकिस्तानकडून काश्मीरबाबत भारतविरोधी कागदपत्रे
Just Now!
X