News Flash

कोलकात्यात तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा भाजप कार्यालयावर हल्ला

यापूर्वी तृणमूलच्या तापस पॉल यांनाही अटक केली होती.

खासदार सुदीप बंदोपाध्याय यांना अटक केल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर हल्ला केला.

रोझ व्हॅली चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार सुदीप बंडोपाध्याय यांना मंगळवारी अटक केली. त्यामुळे संतापलेल्या तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने भाजपच्या कार्यालायावर हल्ला केला. त्यामुळे सध्या कोलकातामध्ये तणाव आहे.

तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांची रोझ व्हॅली चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने चौकशी केल्यानंतर मंगळवारी त्यांना अटक करण्यात आली. याच प्रकरणात तृणमूल काँग्रेसचेच खासदार तपस पाल यांनाही अटक करण्यात आली होती. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. अटक करण्यापूर्वी बंडोपाध्याय यांनी सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी पत्रकारांशी बोलताना दाखवली होती. माझ्याविरोधात राजकीय कट रचल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, रोझ व्हॅली चिटफंड घोटाळा प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालयाकडूनही चौकशी करण्यात येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 5:33 pm

Web Title: bjp office in kolkata attacked by tmc students wing after tmc mp sudip bandyopadhyay arrest
Next Stories
1 दहशतवादी बुरहान वानी शहीद!; जम्मू-काश्मीरच्या आमदाराचे वादग्रस्त विधान
2 पाकिस्तानमध्ये हिंदूविवाहांना मिळणार कायदेशीर मान्यता
3 ग्रामीण भागाला ४०% नोटा पुरवा; आरबीआयचे बँकांना आदेश
Just Now!
X